मसालेदार

भारतातून इथे आल्यांनंतर साधारण दोन-अडीच वर्षानंतरची गोष्ट असेल. भाजी करण्यासाठी तिखटा-मिठाचा डब्बा उघडला आणि पाहते तर काय काळ्या मसाल्याची वाटी रिकामी होती. मग ती भरण्यासाठी कपाटातून काळ्या मसाल्याची बाटली उघडली. अगदी तळाला साधारण महिनाभर पुरेल एवढाच मसाला उरला आहे हे मा‍झ्या पहिल्यांदाच लक्षात आले. लग्नानंतर फिलाडेल्फियाला येतांना मा‍झ्या सासूबाईनी एक किलोचा मोठा पुडा भरून घरी... Continue Reading →

Advertisements
Featured post

बिबिमबाप

इथे माझ्या कॉलेजमध्ये निरनिराळ्या देशातून आलेले विद्यार्थी आहेत जसे कि  इराणियन, चायनीज, कोरियन, युरोपातील काही देशातले! काही विद्यार्थी श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान या आपल्या शेजारच्या देशातून आलेले. प्रत्येकाच्या खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या. कॉलेजच्या आसपास अनेक फूड ट्रक आहेत जिथे आम्ही दुपारचे जेवण विकत घेतो. हे सगळे फूड ट्रक कॉलेज मधील विद्यार्थ्यांना परवडतील अशा दरात पदार्थ विकतात. सगळ्यात... Continue Reading →

राहिले रे दूर घर माझे…!

५१ ‘यक्ष’, अष्टविनायक नगर. आमच्या नांदेडच्या घराचा पत्ता. घराला नाव देणे हा प्रकार अमेरिकेत बिलकुलच नाही. अपार्टमेंट मध्ये राहत असाल तर अपार्टमेंट कॉम्प्लेक्सला नाव असते. पण स्वत:चे घर असले तर मात्र त्याला नाव नसते. घराचा नंबर आणि रस्त्याचा पत्ता. नवीन-नवीन इथे आल्यावर मला ही गोष्ट फार प्रकर्षाने जाणवली होती. आपल्याकडे कसे ‘अमुक तमुक निवास’, ‘अमुक... Continue Reading →

Advertisements

खरवड

आयुष्यातली दु:खं मला एक प्रकारची खरवडच वाटतात त्या वरच्या ‘सुगरणीने’ बनवलेली. आयुष्याची चव वाढवण्यासाठी सगळ्यांना तुकडा-तुकडा वाटलेली!

Advertisements

मी माझ्या बाबांसारखी!

अंजली ताईने फेसबुकवर मेसेज केला...नयन काकांना contact कर लगेच आणि त्यांना Whats app वर add कर!  भारतातून अवेळी मेसेज आला कि मला मनात चर्र होतं. लागलीच Whats app वर मेसेज केला. काकांचा माझ्या रात्री मेसेज आला, " अम्मू, आई बाबा नांदेडहून पुण्याला शिफ्ट होत आहेत म्हणून आम्ही बाबांचा निरोप समारंभ आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने एक... Continue Reading →

Advertisements

पिठलं भाकरी

कशी गम्मत असते ना, कोणाच्या मनात कशासंदर्भात काय असोसिएशन असेल याचं काहीच सांगता येत नाही. आता माझेच बघा ना. पिठलं भाकरी म्हणालं कि मला पहिली गोष्ट काय डोळ्यासमोर येत असेल तर ती सिनेमातली, विशेषतः मराठी सिनेमातली, भाकरी पिठल्याची दुरडी डोक्यावर घेऊन ठुमकत येणारी शेतकऱ्याची बायको! हा हा आहे न गम्मत! शेतकरी उन्हात काम करत असतो... Continue Reading →

Advertisements

उबदार आठवणी

आपल्याकडे कोणत्या ऋतु मध्ये काय खायचे याचा किती सविस्तर विचार केला आहे याचे मला फार कौतुक वाटते. थंडी सुरू झाली की ऊब मिळण्यासाठी तीळ गूळ, बाजरी यांचा आपण आपल्या जेवणात समावेश करतो तर ऊन वाढलं की कैरीची चटणी, ताक अशा थंडावा देणार्‍या गोष्टी समाविष्ट करतो. संक्रांतीला भोगीला आपल्याकडे बाजरीची तीळ लावलेली भाकरी करतात आणि त्याबरोबर मिक्स... Continue Reading →

Advertisements

…अंतर्यामी सूर गवसला!

तिसरी चौथीत असताना माझी एक मैत्रिण होती, श्रुती. आमच्या घराच्या जवळ रहायची. जवळ म्हणजे तिच्या आणि मा‍झ्या कॉलनीतून एक पाण्याचा कॅनॉल जायचा. कॅनॉल ओलांडला की पहिले घर तिचेच. ती आणि मी एकाच शाळेत जायचो. खेळायला कधी तिच्या घरी तर कधी मा‍झ्या घरी.  एकदा मी तिच्या घरी गेलेली असताना ती आणि तिची आई कुठे तरी जाण्याच्या... Continue Reading →

Advertisements

हळदी साठी आसुसलेले…

काही दिवसापूर्वी चैत्र ही शोर्ट फिल्म पाहण्याचा योग आला. ही शोर्ट फिल्म जी. ए. कुलकर्णींच्या कथेवर आधारित आहे हे माहीत होते आणि त्यामुळे ती बघण्याची खूप इच्छा होती. पण अजून युटयूब वर ती आलेली नव्हती. संध्याकाळी छान काही तरी बघावं असं मनात आलं आणि सहज ही फिल्म शोधली. जेमतेम २० मिनिटाची ही फिल्म आहे पण... Continue Reading →

Advertisements

Create a website or blog at WordPress.com

Up ↑