मसालेदार

img_7715-1
तिखटा-मिठाचा डब्बा

भारतातून इथे आल्यांनंतर साधारण दोन-अडीच वर्षानंतरची गोष्ट असेल. भाजी करण्यासाठी तिखटा-मिठाचा डब्बा उघडला आणि पाहते तर काय काळ्या मसाल्याची वाटी रिकामी होती. मग ती भरण्यासाठी कपाटातून काळ्या मसाल्याची बाटली उघडली. अगदी तळाला साधारण महिनाभर पुरेल एवढाच मसाला उरला आहे हे मा‍झ्या पहिल्यांदाच लक्षात आले. लग्नानंतर फिलाडेल्फियाला येतांना मा‍झ्या सासूबाईनी एक किलोचा मोठा पुडा भरून घरी केलेला मसाला दिला होता. पुरेल वर्ष भर या अंदाजाने. मला तर तो अगदी द्रोपदीच्या थालीप्रमाणेच वाटला होता…कितीही वापरला तरी कधीही न संपणारा. पण मला पामराला कुठली मिळतेय द्रोपदिची थाळी! शेवटी एके दिवशी संपलाच!

P1010163
वांग्याची भाजी आणि भात

आता काय करावे? वांग्याची भाजी करायची म्हणल की पाहिजेच न मसाला. एरवी तसं पाहीलं तर धने जिरे पूड, कांदा लसुण आणि तिखट घालून करता येतेच की भाजी. पण आत्ता पर्यंत झालेल्या लाडाने जीभ पण सोकावली होती. त्याचे काय करणार? काळा मसाला तर हवाच! भारतात असताना कधी दुकानातून गरम मसाला किंवा काळा मसाला आणल्याचे आठवत नाही. विकत आणला जाणारा एकमेव मसाला म्हणजे पावभाजी मसाला किंवा सांबर मसाला! त्यामुळे मसाल्याचे ब्रांड काही माहित नव्हते. मग इथे शोधाशोध सुरु झाली. इंडिअन स्टोर मध्ये मसाला सेक्शन मध्ये १०० प्रकारचे मसाल्याचे पाकिटे दिसली. अमेरिकेत curry बद्दल फार आकर्षण आहे. आणि त्या आकर्षणाला cater करण्यासाठी किती तरी कंपन्या आपापले मसाले बाजारात आणतात. त्या १०० मसाल्याचा पाकिटातून त्यातल्या त्यात चांगला वाटणारा मसाला घेऊन आले. उघडून पाहते तर काय नुसतीच भुकटी! न चव न वास! इथे असे अनेकदा होते . १०० प्रकार असून एकही चांगला नाही. मी तर मला एखादी गोष्ट आवडली कि तीन ते चार पाकिटे घेऊन येते. कारण हाच ब्रांड पुन्हा मिळेल याची खात्री नसते.

मसाला हि भारताने जगाला दिलेली एक देणच आहे. हा आपल्या जेवणातला अविभाज्य भाग आहे. ‘स्पायसी’ किंवा मसालेदार म्हणजे तिखटजाळ करणे असे नाही. मसाल्याच्या मिश्रणात काय आणि किती प्रमाणात घालायचे याचा सविस्तर विचार केलेला असतो. त्याची वेगवेगळी combinations करून कशा सोबत काय चांगले लागेल हे पहिले जाते. लहानपणी आई जेव्हा मसाला बनवायची तेंव्हा आमचे घर त्या खमंग वासाने भरून जायचे. मसाला बनवलेल्या भांड्याला (आणि आमच्या कपड्यांना) तो वास निदान आठवडा भर तरी यायचा. सर्वात आधी आई खिसलेले सुके खोबरे खरपूस भाजून घ्यायची. मग धने, मोठी विलायची, लवंग, दालचिनी, चक्रफूल, खसखस, दगड्फुले आणि तमालपत्र तेलावर परतून घायची. हे सगळं मिश्रण थंड झालं कि मिक्सर वाटे बारीक वाटून घायची आणि हवाबंद डब्यात भरून ठेवायची. आई या मसाल्यात तिखट टाकायची किंवा नाही ते मात्र मला नेमके आठवत नव्हते. (आईला विचारले तर म्हणाली कि तिखट टाकले किंवा नाही टाकले तरी चालते ) हा मसाला आम्हाला साधारण वर्षभर तरी पुरायचा. (बहुतेक! कारण आम्हाला फक्त खाणे माहित होते, करणे नाही!) पण मसाला जेंव्हा बनवला जायचा तो दिवस मात्र कळायचा. मग हा मसाला भरलेल्या वांग्याच्या भाजीत, चिंच गुळ घालून केलेल्या आंबट वरणात किंवा नुसताच घट्ट वरणात कांदा आणि तेलाची फोडणी टाकून काय अप्रतिम लागायचा.

महाराष्ट्रात असा मसाला सगळीकडे बनवला जातो. गोडा मसाला किंवा काळा मसाला. कोकणात, विदर्भात किंवा आमच्या मराठवाड्यात थोडा फार एखाद्या दुसऱ्या घटकाचा फरक असावा. याविषयी सायली ताईने एक खूप छान लेख लिहिला आहे त्याची लिंक इथे देते आहे! तिने इतके छान आणि सविस्तर लिहिले आहे कि मी पुन्हा तेच न सांगता तुम्ही तिचा लेख वाचाच! मसाला

Garam_Masala
मसाला साहित्य: सौजन्य विकीपेडिया By Miansari66 – अपना काम, Public Domain, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=5982766

पहिल्या काही अपयशी प्रयत्नानंतर मला एक चांगला मसाला मिळाला आहे. MDH चा तवा फ्राय मसाला. अगदी घराच्या सारखी चव नसली तरीही बऱ्यापैकी चांगला मसाला आहे हा. एकदा असेच इंडिअन स्टोर मध्ये गेलेली असताना मला बाजारात एक खडा मसाल्याचे पाकीट मिळाले. या पाकिटात धने, खोबरे, आणि मसाल्याचे इतर साहित्य होते. हे पाकीट पहिले आणि माझ्या डोक्यात आई बनवते तसा घरी मसाला बनवण्याचे खूळ जागृत झाले. घरी येताच उत्साहाने मी मसाला करायला सुरुवात केली. या पाकिटातले समान योग्य प्रमाणात असणार या खुल्या विश्वासाने मी ते पाकीट खमंग भाजले. थंड करून मिक्सर वाटे बारीक करून घेतले. वास जरी ओळखीचा असला तरी चव मात्र ठीक ठाकच होती. माझा मिक्सर साधा असल्याने मसाल्याची पूड एकसारखी बारीक झाली न्हवती.  या पाकिटात मोठ्या प्रमाणावर star anis चा भडीमार केलेला होता. बहुतेक महाराष्ट्रीयन पद्धतीचा हा मसाला नसावा. पण या प्रयात्नावरून एक तरी कळले कि मसाला बनवायचा असेल तर निदान समान तरी इथे मिळू शकते. एक दोनदा नीट प्रमाण पाहून जर बनवला तर चांगला मसाला बनवता येईल.

मसाल्याची गोष्ट निघाली कि आई नेहमी आजीची, तिच्या आईची गोष्ट सांगते. माझे आजोबा जरा हातच राखूनच समान आणायचे! त्या काळात या मसाल्याच्या गोष्टी महाग पण असणार. त्यामुळे तिला कधीच भरभरून काही मिळत नसे पण त्यातही ती उत्तम स्वैपाक बनवायची. आमच्या पिढीच उलटं आहे, आम्हाला सगळं भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे पण चवीच गणित मात्र आणखी सुटलेलं नाहीये!

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: