बिबिमबाप

इथे माझ्या कॉलेजमध्ये निरनिराळ्या देशातून आलेले विद्यार्थी आहेत जसे कि  इराणियन, चायनीज, कोरियन, युरोपातील काही देशातले! काही विद्यार्थी श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान या आपल्या शेजारच्या देशातून आलेले. प्रत्येकाच्या खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या. कॉलेजच्या आसपास अनेक फूड ट्रक आहेत जिथे आम्ही दुपारचे जेवण विकत घेतो. हे सगळे फूड ट्रक कॉलेज मधील विद्यार्थ्यांना परवडतील अशा दरात पदार्थ विकतात. सगळ्यात जास्त चालणारे ट्रक म्हणजे पिझ्झा ट्रक, एक बर्गर ट्रक , क्रेपे ट्रक ( इथल्या गोड क्रेप्स अमेझिंग असतात), थाई ट्रक, बरेचसे हलाल ट्रक आणि अमेरिकन sandwich विकणारे ट्रक. इथे या ट्रक मालकांना पदार्थ विकण्यासाठी परवाने घ्यावे लागतात. स्वच्छता आणि ताजे जेवण हे या गाड्यांचे वैशिष्ठ आहे. जरा का स्वच्छतेत इकडे तिकडे झाले कि या गाड्यांना तिकीट मिळते आणि जास्त तिकिटे जमा झाली कि त्यांचा परवाना रद्द होतो.

बिबिमबापमागच्या वर्षी माझी एक नवी मैत्रीण झाली आहे. तिचे नाव आहे हिजीन यांग. ती कोरियन आहे. इथे आल्या आल्या तिने पहिल्यांदा कोरियन ट्रक शोधून काढला. एके दिवशी ती दुपारच्या जेवणाला बिबिमबाप घेऊन आली. दिसायला अगदीच colorful असा हा पदार्थ लवकरच माझा पण आवडता पदार्थ झाला. बिबिमबाप!  म्हणतांना गम्मत वाटते ना… बिबिमबाप! हा एक पारंपारिक कोरिअन पदार्थ आहे. मी तरी आधी कधी ह्या पदार्थाबद्दल ऐकलं नव्हतं. तसं पाहिलं तर आपल्याला कोरिअन पदार्थाबद्दल किती माहिती असते? आजकाल आपल्याकडे चायनीज(भारतीय फुजन), थाई, इटालियन एवढंच काय पण मेक्सिकन पदार्थ बरेच फेमस झाले आहेत. पण कोरियन पदार्थ अजून तरी तेवढे फेमस नाहीत. कोरियन बार्बेक्यू तर जगात सर्वत्र प्रसिद्ध आहे.

इथे मिळणारे बिबिमबाप
इथे मिळणारे बिबिमबाप

आता इतक्या वेगवेगळ्या देशातल्या मैत्रिणी असल्यावर मी नवे पदार्थ शिकण्याची संधी कशी हातची जाऊ देईल बर? बिबिमबाप करायला खूप सोपा आहे पण सगळ्या भाज्या कट करून वेगवेगळ्या शिजवल्या जातात त्यामुळे जर आधीच तयारी करून ठेवली तर तुमच्या पाहुण्यांना कोरियन मेजवानी नक्कीच देता येईल. एका मोठ्या बोउल मध्ये मध्यभागी भात आणि आजूबाजूला वेगवेगळ्या भाज्या (गाजर, वांगे, मोड आलेले मुग, हिरवा पिवळा स्क़ाश तुम्हाला जे आवडेल ते ), टोफू आणि वरून दिलेल एक फ्राइड अंड असा साधाच पदार्थ. त्याबरोबर ते किमची म्हणजे कोबीचे लोणचे (किंवा काकडीचे लोणचे: हे लोणचे अगदी वाळकाच्या लोणच्या सारखे लागते ) आणि एक तिखट सॉस (कोचुजांग) खातात. कोरियन जेवण हे अतिशय तिखट असते. चायनीज, कोरियन लोकांच्या जेवणात मासाच्या बरोबरीने भाज्यांचा भरपूर वापर असतो.  मी घरी हा पदार्थ बनवताना सर्व भाज्या मोठ्या खिसनीवर खिसून घेतल्या होत्या. पण त्याने मला हवे तसे texture  काही आले नाही. तुम्हाला हवे तर तुम्ही गाजर आणि वांग्याचे लांब काप करू शकता. ह्या भाज्या(एका वेळेस एक भाजी ) तव्यावर तीळाच्या तेलात वाफवून घ्यायच्या.

खाताना सगळं एकत्र करायचं आणि खायच!
खाताना सगळं एकत्र करायचं आणि खायच!

अगदीच पारंपारीक बनवायचे असेल तर कोरियन किंवा जपानी भात वापरा. हा भात लहान शीताचा असतो आणि थोडासा चिकट असतो. अंडे आवडत नसेल तर ते नाही टाकले तरी चालेल. खायच्या आधी सगळ्या भाज्या आणि अंड एकत्र करायचे (गोपाळकाल्यासारखे!) आणि त्यात चवीपुरता हा तिखट सॉस टाकायचा आणि खायचे. हा पदार्थ शाकाहारी आणि मासाहारी अशा दोन्ही प्रकारे बनवता येतो.  ह्या पदार्थाला एक वेगळाच फ्रेशनेस आहे. इतक्या भाज्या आणि टोफू घातलेला असल्याने तो अतिशय हेल्दी तर आहेच पण यासोबतचा तिखट सॉस याला छान चव देतो. नेहमीचे तेच तेच खाऊन कंटाळला असाल तर हा रंगीबेरंगी, हेल्दी पण चवदार पदार्थ नक्की करून पहा किंवा जवळपास जर एखादे कोरियन हॉटेल असेल तर तिथे चक्कर मारून या!

 

Advertisements

One thought on “बिबिमबाप

Add yours

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: