खरवड

उपमा, शिरा किंवा अगदी साबुदाण्याची खिचडी करताना भांड्याला खाली चिकटलेल्या ‘खरवडी’साठी आम्ही भावंड जीव टाकत असू. आमची भांडणं टाळण्यासाठी आई उपमा सर्वांना वाढून झाला की ही खरवड चमच्याने काढून सगळ्यांच्या ताटात वाढायची. खरवड म्हणजे भांड्याला खाली चिटकलेला उपमा/शिरा याची एक खरपूस लेयर! आता तुम्ही म्हणाल यात जीव टाकण्यासारखे काय?  ही खरवड एकदम खमंग लागते आणि गरम भांड्याला चिटकल्याने ती कुरमुरीत लागते. तस पाहीलं तर स्वैंपाक करताना भांड्याला पदार्थ भांड्याला चिटकला तर काही त्या गृहिणीला फार काही सुगरण समजले जात नाही. पण मला वाटते की चवदार खरवड तयार करणे हे पण एक प्रकारचे कसबच आहे. पदार्थ भांड्याला अगदी नेमका चिटकला पाहिजे की त्याची खरपूस लेयर बनावी पण जळून त्याची कडवट चव लागू नये!

फिलाडेल्फियाला मा‍झ्या कॉलेज मध्ये अनेक इरानियण विद्यार्थी आहेत. मराठी आणि फारसी या भाषांमधील कमालीचे साम्य हा आमचा संभाषणाचा आवडता विषय असतो. मला या गोष्टीचे फारच आश्चर्य वाटते पण तसं पहिले तर माझे आजोबा एक म्हण नेहमी सांगायचे, हात कंकण को आरसी क्या, पढे लिखे को फारसी क्या!!! साध एक ते दहा मध्ये फक्त सहा सोडलं तर सगळे आकडे सेम! दुधाला ‘क्षीर’ भाजीला ‘सब्जी’ आवडला ‘पसंद’ छत्री ला ‘छत्र’ असे अनेक शब्द आपल्या सारखेच. आणि वकील म्हणजे फारसी मध्ये पण वकिलच!!! असो इथे सांगण्याचा मुद्दा राहिला दूरच! तर… मला त्यांनी बनवलेला शेपू भात फार आवडतो. मा‍झ्या मैत्रिणीला मी ते एकदा दोनदा म्हणाले तर एके दिवशी तिने मा‍झ्या साठी शेपू भात डब्ब्यात आणला. आनंदाने उड्या मारत मी तो घेतला आणि डब्बा उघडून पाहते तर तिने मला या भाताबरोबर भाताच्या खरवडीचा एक तुकडा पण दिला होता. मला आश्चर्य वाटले. आपण इतरांना वाढताना कधी खाली लागलेलं देत नाही.  ती पण जेव्हा हा भात किंवा आणखिन दुसर्‍या प्रकारचा भात आणायची तेंव्हा त्या सोबत खरवडीचा तुकडा आणायची. उत्सुकतेपोटी मी तिला याबद्दल विचारले तर म्हणाली आमच्याकडे भाताची खरवड तयार करणे हे सुगरणीचे लक्षण समजतात. खास खरवड तयार ह्वावी म्हणून ते भांड्याला पीठाचा थर किंवा बटाटा उकडून आणि कुस्करून त्याचा थर देतात!

आयुष्यातली दु:खं मला एक प्रकारची खरवडच वाटतात त्या वरच्या ‘सुगरणीने’ बनवलेली. आयुष्याची चव वाढवण्यासाठी सगळ्यांना तुकडा-तुकडा वाटलेली!

Alternate ending

आयुष्यातली दु:खं मला एक प्रकारची खरवडच वाटतात. आता हे प्रत्येक ‘सुगरणीच्या’ हातात आहे की त्याची चवदार खरवड होऊ द्यायची की जळून कडू होऊ द्यायचे!

Advertisements

One thought on “खरवड

Add yours

  1. खरवड ही भांडया खालच्या आचेवर अवलंबून असते ; आणि प्रत्यक्षात ती आंच किती
    असावी यावर बहुतेक वेळा कोणत्याही ‘सुगरणीचा’ ताबा नसतो.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: