तीन कथांचे आयुष्य! भाग: ३

Steve Jobs,   Apple  कंपनीचा निर्माता… एक वादळी व्यक्तिमत्व. जेवढा अफलातून माणूस तेवढेच अफाट त्याचे आयुष्य! Stanford university च्या पदवीदान सोहळ्यात त्यांनी दिलेले हे भाषण माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळचे आहे. माझ्या मराठी वाचकांसाठी या भाषणाचा हा स्वैर अनुवाद.

(तीन कथांचे आयुष्य : भाग १ आणि )

माझी तिसरी गोष्ट आहे मृत्यू बद्दलची.

मी जेंव्हा सतरा वर्षांचा होतो तेंव्हा मी एक वाक्य वाचले होते, “तुम्ही जर रोजचा दिवस तुमच्या (आयुष्यातला ) शेवटचा दिवस आहे असे जगलात तर एके दिवशी तुम्ही नक्कीच खरे असाल” या वाक्याचा मा‍झ्या मनावर फार खोल वर परिणाम झाला. त्या दिवसापासून मागची ३३ वर्ष मी सकाळी आरशासमोर उभे राहून स्वत:ला रोज विचारले आहे” हा जर मा‍झ्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल तर मला मी आज जे करणार आहे ते करण्याची मला इच्छा आहे का?” या प्रश्नाचे उत्तर जर बरेच दिवस “नाही “ असे येत असेल तर मी असे समजून घेतो की मला मा‍झ्या आयुष्यात काही बदल करणे आवश्यक आहे. आपण काही दिवसात इथे नसू (आपल्याकडे खूप कमी वेळ आहे ) या विचाराने मला अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात मदत केली आहे. मृत्यू हि एक अशी गोष्ट आहे ज्या पुढे अपेक्षा, मी पणा आणि पराभवाचे/अपयशाचे भय सर्व काही गळून पडते आणि राहतो तो फक्त मुळ गाभा. पूर्ण सत्य.

एका वर्षापूर्वी मला कॅन्सर झाला आहे असे समजले. सकाळी-सकाळी मी दवाखान्यात गेलो तेंव्हा कळले की मला पंक्रेया चा कॅन्सर झाला आहे. तो पर्यंत मला अशा नावाचा कोणता अवयव असतो हे देखील माहीत नव्हते. या प्रकारच्या कॅन्सर वर कुठलाही उपाय नाही आणि मा‍झ्या कडे जास्तीत जास्त सहा महिन्यांचा अवधी आहे असे मला डॉक्टरांनी सांगीतले. डॉक्टरांनी मला असा सल्ला दिला की घरी जाऊन हि बातमी मी माझ्या प्रियजनांना द्यावी. जणू एकप्रकारे ते मला सांगत होते की मरणासाठी तैय्यार हो. मा‍झ्या मुलांना सांग की पुढच्या १० वर्षांसाठी आपण जे प्लान केले होते ते या सहा महिन्यातच जगून घ्यावे लागतील. मा‍झ्या कुटुंबाला मा‍झ्या नंतर आयुष्य सोपे जावे म्हणून सर्व तयारी कर. आणि याचाच अर्थ असा की निरोपाची वेळ जवळ आली आहे.

पूर्ण दिवस मी या निदानाच्या काळजीत घालवला. संध्याकाळी माझी बायोप्सी करण्यात आली. यासाठी माझ्या घशातून पोटात मग आतड्यात आणि मग माझ्या पन्क्रेआ मधून सुई द्वारे काही भाग बाहेर काढण्यात आला. मला यासाठी गुंगीचे औषध देण्यात आले होते. नंतर मा‍झ्या पत्नीने मला सांगीतले की जेंव्हा डॉक्टरांनी तो पन्क्रेआ चा भाग मिक्रोस्कॉप खाली पहिला तेंव्हा ते चक्क रडायला लागले. हा कॅन्सर चा अतिशय दुर्मिळ असा प्रकार होता ज्यावर उपचार करणे एका सध्या शस्त्रक्रियेने शक्य होते. माझ्यावर ती शस्त्रक्रिया करण्यात आली आणि मी कॅन्सर मुक्त झालो. मृत्यूला मी पहिल्यांदाच इतक्या जवळून पहिले होते आणि आणखिन काही वर्षांनी पुन्हा पाहीन. पण हा अनुभव घेतल्यानंतर मी असे नक्कीच म्हणू शकतो की मृत्यू हि  एक उपयोगी अशी संकल्पना  आहे.

मरण कुणालाच नको असते . ज्यांना स्वर्गात जाण्याची इच्छा असते त्यांना सुद्धा न मरता तिथे जायचे असते. आणि असे असले तरीही आपल्या सगळ्यांना मरण येणारच आहे. ते कुणालाच चुकलेले नाही . असे असेल तरी मृत्यू हे आयुष्यातला सर्वात चांगला शोध आहे. जुने नाहीसे करून नव्या साठी मोकळी जागा करण्याची ही क्रिया आहे. आता तुम्ही ते ‘नवे’ आहात पण थोड्याफार काळानंतर तुम्ही जुने (म्हातारे ) होणार आणि नव्यासाठी तुम्हाला जावे लागणार . इतके स्पष्टपणे सांगितल्याबद्दल माफ करा पण हेच सत्य आहे. तुमच्या कडे खूप कमी वेळ आहे तो (मौल्यवान) वेळ दुसर्‍याचे आयुष्य जगण्यात घालवू नका. दुसर्‍यांच्या मतांच्या ओझ्यात तुमचे मत दाबून जाऊ देऊ नका. सगळ्यात महत्त्वाचे हे की तुमचे हृदय आणि तुमची अंतःप्रेरणा तुम्हाला काय सांगते ते ऐका. या गोष्टींना माहीत असत की तुम्हाला काय बनायचे आहे. बाकी कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही.

मी जेंव्हा तरुण होतो तेंव्हा ‘ the whole earthcatalog  ‘ नावाचे एक अफलातून प्रकाशन होते . मा‍झ्या पिढीसाठी तर ते गीते सारखे होते. हे प्रकाशन  Stewart Brand या कवी मनाच्या माणसाने इथ जवळच असलेल्या मेन्लो पार्क नावाच्या गावातून सुरू केले होते. तो काळ १९६०चा होता जेंव्हा कॉम्पुटर किंवा डेस्क् टोप नव्हते आणि सर्व काही टाईपरायटर, कात्र्या आणि साध्या camera वापरून बनवलेले होते. आत्ताच्या काळाच्या व्याख्येत म्हणालच तर ते पुस्तकाच्या स्वरुपातील गुगल म्हणता येईल जे गुगल च्या ३५ वर्ष आधी अस्तित्वात होते.   Stewart आणि त्याच्या चमूने ह्या प्रकाशनाचे अनेक अंक काढले आणि जेंव्हा त्यांना वाटले की आता थांबायला हवे तेंव्हा त्यांनी शेवटचा अंक काढला. तो काल १९७० चा होता. मी तेंव्हा तुमच्या वयाचा होतो. त्या शेवटच्या अंकाच्या शेवटच्या पृष्ठावर एक फोटो होता ज्यात लांब जाणारा रस्ता होता. एखाद्या प्रसन्न सकाळी ज्यावरून लांबच्या रोमांचकारी प्रवासाला जावेसे वाटेल. त्या खाली लिहिलेले होते’ (ज्ञानासाठी ) भुकेले राहा. (कामामागे ) नाद खुळे व्हा! (Stay hungry. Stay foolish) (या मधला फुलीश कितीतरी प्रकारे वापरलेला असू शकतो) नवीन गोष्टीसाठी मन मोकळे ठेवा. या वाक्याने त्यांनी या प्रकाशनाची सांगता केली. मी नेहमी हा विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. आज तुम्ही आयुष्याच्या नवीन पर्वाची सुरुवात करत आहात तर तुम्हाला मी हाच विचार मनात ठेवण्याचा सल्ला देतो.

(ज्ञानासाठी ) भुकेले राहा. (कामामागे ) नाद खुळे व्हा!

धन्यवाद!

समाप्त.

stay_hungry_stay_foolish

Advertisements

3 thoughts on “तीन कथांचे आयुष्य! भाग: ३

Add yours

  1. ” हा जर मा‍झ्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल तर मला मी आज जे करणार आहे ते करण्याची मला इच्छा आहे का?”.. Aaj parat vachla mee… kharach kevdhi bhannat kalpana aahe hi. Antarmukh vhayala hota.. tu purn speech ch translation pan mast kelays Mugdha. Sollidd!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: