तीन कथांचे आयुष्य! भाग: २

Steve Jobs,   Apple  कंपनीचा निर्माता… एक वादळी व्यक्तिमत्व. जेवढा अफलातून माणूस तेवढेच अफाट त्याचे आयुष्य! Stanford university च्या पदवीदान सोहळ्यात त्यांनी दिलेले हे भाषण माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळचे आहे. माझ्या मराठी वाचकांसाठी या भाषणाचा हा स्वैर अनुवाद.

भाग १ 

माझी दुसरी गोष्ट आहे प्रेम आणि गमावण्याच्या दुखाबद्दलची.
steve_jobs___iphone_4s_by_wineass-d53huawमी तसा नशीबवान होतो. मला आयुष्यात काय करायला आवडेल हे मला (आयुष्यात) खूप लवकर लक्षात आले. वयाच्या २०व्या वर्षी वोझ च्या संगतीने अप्पल कंपनीची आमच्या राहत्या घरातून सुरुवात केली. दहा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर ही २ माणसांनी सुरू केलेली कंपनी २ बिलियन डॉलर किमतीची झाली आणि जवळपास ४००० कामगार एवढी मोठी झाली. मी अवघा तीस वर्षांचा होतो जेंव्हा आमच्या कंपनीने सर्वोत्तम कॉम्पुटर तयार केला होता. आणि  त्याच सुमारास मला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. मा‍झ्याच कंपनीतून मला काढणे कसे काय शक्य आहे?  झाले असे की, कंपनीचा वाढता व्याप सांभाळण्यासाठी आम्ही एका नवीन माणसाला नियुक्त केले. तो माणूस अतिशय हुशार आहे असे मला वाटले होते. पहिले वर्ष सुरळीत पार पडले. पण नंतर मात्र आमच्यात वैचारिक मतभेद वाढू लागले आणि हळूहळू आम्ही एकमेकांपासून दुरावलो. कंपनीच्या बोर्डाने देखील या बाबतीत त्याचीच बाजू उचलून धरली आणि मला काढून टाकण्यात आले. गाव भर बोभाटा होऊन वयाच्या तिसाव्या वर्षी मी बेकार झालो. ज्या ध्येयासाठी मी माझे अखं तारूण्य दिलं होतं तेच आता मा‍झ्या हातातून गेलं होतं. मी नैराश्याच्या गरतेत फेकला गेलो.

पुढील काही महिने मला काय करावे ते काहीच कळत नव्हते. मागच्या काळातील उद्योजकांचा मी विश्वासघात केलाय असे मला वाटायला लागले. त्यातील काही मोठ्या व्यक्तींची मी प्रत्यक्ष भेटून माफी पण मागीतली. मला चार लोकांमध्ये मान होता आणि या सर्व प्रकारामुळे मी या सगळ्या पासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला. असे सगळ घडत असले तरीही हळूहळू मला जाणवायला लागले की माझे काम मला खूप आवडते. मी धिक्कारलो गेलो होतो पण माझे काम नाही. मग मी नव्याने उभे राहण्याचे ठरवले. मा‍झ्या कंपनीतून बाहेर पडावे लागणे हे मा‍झ्या साठी किती चांगले ठरणार होते ते मला त्या वेळी कळले नव्हते. पण खरे पहिले तर ती मा‍झ्या आयुष्यातली सगळ्यात चांगली घटना ठरली. यशस्वीपणाचे जोखड झुगारून पुन्हा नाविन्याच्या उत्साहाने शून्यातून सुरुवात केली. हा काल मा‍झ्या आयुष्यातील सर्वात सृजनशील काळ होता.  पुढच्या पाच वर्षात मी NeXT आणि Pixar नावाच्या कंपन्या सुरु केल्या आणि याच काळात मी एका छान युवतीच्या प्रेमात पडलो जी नंतर माझी बायको झाली. Pixar कंपनीने पुढे जाऊन Toy Story नावाचा जगातला पहिला कॉम्पुटर अनिमेतेड सिनेमा काढला आणि आता सिनेमा क्षेत्रातील जगातली सर्वात यशस्वी कंपनी झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अप्पल नेNeXT विकत घेतली आणि मी परत अप्पल मध्ये दाखल झालो. जी तेक्नोलोजी आम्ही NeXT मध्ये शोधून काढलीआणि विकसित केली ती आता अप्पलचा गाभा आहे. याच काळात मी आणि माझी पत्नी लौरेन मिळून आमचे नवे आयुष्य सुरू केले.

मला पक्की अशी खात्री आहे की जर मला अप्पल मधून काढून टाकण्यात आले नसते तर या पैकी काहीच झाले नसते. कधी-कधी औषध कडू असलं तरी  या कडू औषधाची मला गरजच होती. आयुष्य कधी-कधी आपल्याला तोंडघशी पाडत पण त्याने खचून जाऊ नका. स्वत: वरचा विश्वास ढळू देऊ नका. मला माझ काम अतिशय आवडायचे आणि माझा असा विश्वास आहे की त्या प्रेमानेच मी तरलो गेलो. जे काम तुम्हाला आवडते तेच करा आणि त्या कामाशी प्रमाणिक राहा. तुमचं काम तुमच्या आयुष्याचा मोठा भाग व्यापणार आहे म्हणून आयुष्यात समाधानी राहायचे असेल तर असे काम करा जी ज्यावर तुमचा विश्वास आहे कीहे खूप मोठे आणि महत्त्वाचे काम आहे. आणि असे महत्त्वाचे काम करायचे असेल तर त्यावर तुमचे प्रेम हवे. तुमचे (ध्येय )काम जर तुम्हाला सापडले नसेल तर ते शोधत राहा. पण जे आवडत नाही ते करत वेळ दवडू नका. जेंव्हा ते सापडेल तेंव्हा तुमच्या मनाला आपोआप कळेल कीहे मला आवडते. वर्ष जशी-जशी सरत जातात तसे नात्याचे धागे घट्ट होतात तसेच या (काम आणि तुम्ही )नात्याचे पण आहे. शोधत राहा.

पुढील भाग पुढच्या रविवारी!

Advertisements

One thought on “तीन कथांचे आयुष्य! भाग: २

Add yours

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: