तीन कथांचे आयुष्य! भाग: १

steve_jobs___iphone_4s_by_wineass-d53huawSteve Jobs,   Apple  कंपनीचा निर्माता… एक वादळी व्यक्तिमत्व. जेवढा अफलातून माणूस तेवढेच अफाट त्याचे आयुष्य! Stanford university च्या पदवीदान सोहळ्यात त्यांनी दिलेले हे भाषण माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळचे आहे. माझ्या मराठी वाचकांसाठी या भाषणाचा हा स्वैर अनुवाद.

आज जगातील सर्वोत्तम युनिवर्सिटी मधील तुमच्या पदवीदान समारंभात मला सहभागी होता आले हा मी माझा गौरव समजतो. मला कधीच कॉलेज मधून पदवी मिळाली नाही. खरं सांगायचे झाले  तर, पदवीदान समारंभात इतक्या जवळून सहभागी होण्याची हि माझी पहिलीच वेळ आहे. आज मी तुम्हाला मा‍झ्या आयुष्यातील तीन गोष्टी सांगणार आहे. तेवढंच! विशेष असं काही नाही. फक्त तीन गोष्टी.

त्यातील पहिली गोष्ट आहे बिंदूंना जोडून चित्र बनवण्याची. (घटनांचा अर्थ लावण्याच्या प्रयत्नाची!)

रीड कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन अवघे सहा महिने झाले नाही तोच मी कॉलेज सोडून देण्याचा निर्णय घेतला होता. तसे असले तरीही मी जवळपास १८ महिने कॉलेज मध्येच थांबलो. मी कॉलेज सोडण्याचा निर्णय का बरे घेतला असावा ? या सगळ्याची सुरुवात माझ्या जन्माच्या आधी पासूनच झाली होती. माझी (जन्मदाती )आई एक अविवाहित विद्यार्थिनी होती म्हणून तिने मला दत्तक देण्याचा निर्णय घेतला. तिची अशी इच्छा होती की मला दत्तक घेणारे पालक निदान पदवीधर तरी असावेत. त्यामुळे एक वकील आणि त्याच्या पत्नीची तिने माझे भावी आई बाबा म्हणून निवड केली. झाले असे की मा‍झ्या जन्मानंतर काही क्षणातच मा‍झ्या भावी आई वडीलांनी असे ठरवले की त्यांना मुलगीच दत्तक म्हणून हवी आहे. [अमेरिकेत दत्तक घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची यादी बनवली जाते ]त्या यादीमध्ये पुढचे नाव माझा (आत्ताच्या ) आई वडीलांचे होते. त्या दिवशी मध्यरा‍त्री त्यांना अचानक फोन आला. “मुलगा जन्माला आला आहे, तुम्हाला दत्तक घेण्याची इच्छा आहे का?” यावर अर्थातच त्यांचे उत्तर होते… हो.

मा‍झ्या जन्मदात्या आईला नंतर कळले की माझी नवी आई कधीच कॉलेज पास झाली नाही आणि मा‍झ्या बाबांनी तर कधी शाळा पण पूर्ण केली नाही तेंव्हा तिने मला दत्तक देण्यास नकार दिला. काही महिन्यांनंतर मात्र तिचे हृदय परिवर्तन करण्यात माझे आई बाबा यशस्वी झाले. त्यांनी तिला वचन दिले की ते मला नक्की कॉलेज ला पाठवतील! आणि १७ वर्षानंतर मी कॉलेज ला गेलो सुद्धा! पण मी अजाणपणे असे कॉलेज निवडले की जे Stanford University इतके महाग असल्याने मा‍झ्या आई वडीलांची आयुष्याची जमा पुंजी मा‍झ्या कॉलेजची फीस भरण्यात खर्च होऊ लागली. ६ महिन्यात मला हे सगळे व्यर्थ वाटायला लागले. मला बिलकुल कल्पना नव्हती की मला आयुष्यात काय करायचे आहे आणि कॉलेज मध्ये शिकून ते कसे कळणार हे मला कळत नव्हते. आणि मी आपला मा‍झ्या आई वडीलांची कमाई खर्च करत होतो. म्हणून मी कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला आणि मनाशी ठरवले की सगळे काही चांगले होईल. त्या वेळी हा निर्णय खूप अवघड होता पण आता मागे वळून पाहताना असे वाटते की हा मा‍झ्या आयुष्यातला आज पर्यंतचा सर्वात चांगला निर्णय होता. आता मी कॉलेज मधील साचे बद्ध विषय न घेता मला आवडतात त्या विषयांच्या वर्गात जाऊन बसू लागलो.

हे सगळं जितकं सोपं वाटतंय खरे तर ते तितकं सोपं बिलकुल नव्हत. मला राहण्यासाठी खोली नव्हती म्हणून मी मित्रांच्या घरी जमिनीवर झोपायचो. भंगार विकून जेवणासाठी पैसे जमा करायचो.  दर रविवारी आठवड्यातून एक वेळेच तरी चांगले जेवायला मिळावे म्हणून ७ मैल चालत हरे कृष्ण मंदिरात जात असे. कुतूहलापोटी आणि अंतःप्रेरणा म्हणून त्या काळात जे-जे काही शिकलो ते किती मौल्यवान आहे ते मला नंतर कळले. याचेच एक उदाहरण सांगतो.

त्या काळी रीड कॉलेज हे कॅल्लीग्राफी विषयामध्ये देशातील सर्वात चांगले कॉलेज होते. कॉलेज परिसरात सगळी नावे/पाट्या  सुंदररीत्या लिहिलेली होती. मी बाकीचे विषय शिकत नसल्याने मी हा विषय शिकण्याचे ठरवले. या विषयांतर्गत मी serif and san serif typefaces या फोन्ट बद्दल शिकलो, वेगळ्या-वेगळ्या अक्षरात जागा कमी जास्त कशी करावी आणि अंकलिपी सुंदर कशी बनवावी हे सगळे शिकलो. हे सगळं इतकं सुंदर, ऐतिहासिक आणि कलापूर्ण होतं की कोणतंही विज्ञान हे सार उलगडून सांगू शकत नव्हतं आणि मी या सगळ्याने अक्षरश: भारावून गेलो होतो. या सगळ्या शिक्षणाचा मला उद्योग धंदा मिळवण्यास काहीही फायदा होणार असे वाटत नव्हते. पण दहा वर्षांनी जेंव्हा आम्ही पहिला Macintosh computer बनवत होतो तेंव्हा मला याचा खूप फायदा झाला. या सगळ्या ज्ञानाला वापरून आम्ही Mac बनवला. तो पहिला असा कॉम्पुटर होता की ज्यात सुंदर अंकलिपी होती. जर मी कॉलेज सोडून कॅल्लीग्राफी हा विषय घेतला नसता तर Mac मध्ये एवढे सुंदर फॉंट नसले असते. आणि Microsoft Windowsने जर Mac सारखाच कॉम्पुटर बनवला नसता तर बहुधा कॉम्पुटर मध्ये एवढे सुंदर फॉंट आलेच नसते. या सगळ्या घटनांचे भाकीत करणे कॉलेज मध्ये असताना खरेच शक्य नव्हते. पण आता मागे वळून पाहताना त्यांचे मा‍झ्या आयुष्यातील महत्त्व स्पष्ट दिसत होते.

आपल्या आयुष्यातील घटनांचा (आपल्या )पुढच्या आयुष्यावर काय प्रभाव असणार आहे याचा तुम्ही या क्षणी अर्थ लावू शकत नाही. मग तुम्हाला विश्वास ठेवून पुठे जावे लागते की यातून पुढे मागे काही तरी होणार आहे. काही तरी अर्थ असणार या घटनांच्या मागे. तुम्हाला कशावर तरी विश्वास ठेवावा लागेल मग तो विश्वास तुमची धडपड, तुमचे नशीब, आयुष्य किंवा तुमची करणी  काहीही असू शकतो. (पण काही तरी करत राहा) मी या विश्वासावर आज वर चालत आलो आहे आणि मा‍झ्या आयुष्याला जे काही वळण मिळाले आहे ते त्या विश्वासामुळेच.

पुढील भाग पुढच्या रविवारी !

Advertisements

2 thoughts on “तीन कथांचे आयुष्य! भाग: १

Add yours

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: