इंग्लिश भाजी देसी way!

मुंबईत काही वर्ष राहिल्याने सुपर मार्केट मध्ये जाणे तसे काही माझ्यासाठी नवीन नव्हते. राणी ताई कडे असताना सामान आणण्यासाठी कधी-कधी मी मॉल मध्ये जायचे. आपल्याकडे कोणते ब्रांड विकत घ्यायचे ते माहित असल्याने कमी कॉन्फुजन होते. पण इथले मॉल म्हणजे अली बाबाची गुहाच! काय विकत आणावे काहीच कळत नाही. त्यात प्रत्येक गोष्टीचे सतराशे साठ प्रकार आणि तेवढेच ब्रांड! आता साध्या तेलाचे कितीतरी प्रकार ! मग सहज मनात प्रश्न येतो का?  कशाला एवढे प्रकार? यातले काय चांगले आणि काय वाईट ? आणि तेवढीच अमिष! माझी तर गत अगदी ‘kid in a candy shop’ अशीच होते.

virtualtourist: Reading Terminal Market!
virtualtourist: Reading Terminal Market!

बरे सामानात इतके प्रकार असतील पण भाज्यांचे तरी सरळ साधे हवे ना… पण नाही तिथे तर याच्या पेक्षा अधिक घोळ! मला वाटले की निदान भाजी घेऊन येणे तरी साधा सरळ असेल. कारण भाजी-भाजी म्हणजे काय असणार… पालक, कांदा, बटाटा, तमाटे, वांगे, आणि कोबी! फिलाडेल्फिया मधलं रीडिंग टर्मिनल मार्केट हे माझं आवडतं मार्केट आहे. http://www.readingterminalmarket.org/ हे मार्केट ५-६ ब्लॉक च्या दरम्यान पसरलेले असून इंडोर मार्केट आहे.  पहिल्यांदा जेंव्हा भाजी आणायला गेले तेंव्हा तर मी चक्रावूनच गेले होते. किती प्रकारच्या भाज्या आणि भाज्यांचे किती प्रकार! साध्या बटाट्याचे किती प्रकार असावेत, रेगुलर बटाटा, लाल, जांभळा बटाटा, पातळ कव्हर चा बटाटा जाड कव्हर चा बटाटा! रताळे आणि रताळ्याचे भाऊ याम! तीच गोष्ट टमाट्यांची! ग्रेप टमाटे, वाईन टमाटे, लांब टमाटे, हिरवे टमाटे… ढब्बू मिरची हिरवी, पिवळी, लाल आणि तांबडी, कधी लांबट, कधी छोटी! लांबट वांगे, भरीताचे वांगे पण छोटे वांगे काही दिसेनात!  नवीन माणसाच डोकं चक्रावणार नाही तर काय? आणि ओळखीच्या भाज्या काही मिळेनात! या भाज्यांसाठी मग इंडिअन स्टोर धुंडाळून पाहिलं! मग या दुकानात जाऊन छोटे वांगे, भेंडी, कद्दू, तोंडली, कारले कधी luck असेल तर गवार अशी बाहेर न मिळणारी भाजी आणायला लागले.

squash-guide
वेगवेगळ्या प्रकारचे भोपळे आणि त्यांची नावे!

हिवाळ्यात बाजारात सगळी कडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भोपळे दिसायला लागतात. मोठे/छोटे लाल भोपळे, पिवळे भोपळे ज्यांना स्पॅगेटी स्क्वाश म्हणतात, लहान हिरव्या रंगाचे अकोर्न स्क्वाश, भुरकट रंगाचे बटर नट स्क्वाश! इथले काही भोपळे एवढे मोठे असतात की त्यांना पाहून मला भोपळा आणि म्हातारीची गोष्ट आठवते. लहानपणी मुठी एवढे किंवा जास्तीत जास्त मोठ्या पातेल्या एवढे भोपळे पाहून सवय असल्याने या म्हातारीने केलेली वाघाची आणि सिंहाची गम्मत फक्त गोष्ट वाटते! असे काही खरे झाले असेल असे काही वाटत नाही. पण इथे आल्यावर या भोपळ्यांना पाहून आमच्या मनात प्रश्न आला की ही खरी भारतीय बाल कथा आहे की परदेशी कथेवर आधारित कथा आहे. जर ती परदेशी कथा असेल तर मला आश्चर्य याचे वाटते की ती किती सहजपणे आपल्या भारतीय संस्कृतीत सामावून गेली आहे.

download
Artichoke
images
Brussels Sprout

बरेचदा असे होते की त्याच- त्याच भाज्या  खाऊन कंटाळा येतो आणि इंडियन स्टोर मध्ये सारखं जाणं होत नाही.  आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक ऋतुत मिळणाऱ्या भाज्यांमागे निसर्गाची काही तरी योजना आहे. मग या नव्या भाज्या आमच्या जेवणात समाविष्ट करायला हव्यात. या विचाराने मी काही- काही भाज्या आणायला सुरुवात केली. मग सुरुवातीला निदान रंग रूपाने ओळखीच्या झालेल्या भाज्या आणायला लागले. जसे की ब्रोकोली, हिरवी फुलकोबी आणि जांभळ्या रंगाची पानकोबी. आपल्याकडे जसे दोडके मिळतात तसे इथे हिरव्या आणि पिवळ्या प्रकारचे लांब पण बिना शिरांचे भोपळे मिळतात त्यांना झुकीनी असे म्हणतात. काही भाज्या किती गमतीदार दिसतात म्हणून आणल्या. जसे कि आर्टीचोक-मस्त कमळाच्या फुलासारखी भाजी, अस्पॅरॅगस नावाची बाणासारखी भाजी आणि  ब्रसेल स्प्राऊट छोटी पानकोबी सारखी दिसणारी  भाजी. काही भाज्या बाहेर हॉटेलमध्ये  मध्ये खाऊन ओळखीच्या झाल्या म्हणून आणायला लागले. जसे कि अवकॅडो, हे एक मेक्सिकन फळ आहे. त्याचे निरनिराळे प्रकार बनवता येतात पण इथे त्याचा सगळ्यात फेमस पदार्थ म्हणजे गोकोमोली. टमाटे, कांदा बारीक चिरून या अवकॅडो मध्ये घालतात आणि वरून जीऱ्याची पूड, मीठ , तिखट मिसळतात.

या नवीन भाज्या घरी आणायला तर लागले पण यांचं करायचं काय? मग शोध सुरु झाला तो या इंग्लिश भाज्यांना देशी टच देण्याचा! काही भाज्या अगदी सहजपणे आमच्या जेवणात सामावून गेल्या. काही भाज्यांना मात्र भारतीय style चांगली लागेना. These vegetables just denied to get ‘curried’ away from their identity!  इथे जी जांभळ्या कलर ची कोबी मिळते तिची मी थोडा कांदा, कढीपत्ता घालून तव्यावर परतून भाजी करते. त्याला थोडं शेंगदाण्याच कुट लावला तर हि भाजी आणखीन छान लागते. झुकीनीची मी डाळ घालून भाजी करते. कधी नुसते कांदा. टमाटे घालून तर कधी शेंगदाण्याचे कुट लावून!

Spaghetti squash
Spaghetti squash

स्पॅगेटी स्क्वाश हि एक अजबच भाजी आहे. हा भोपळा उभा कापून घ्यायचा. या भाजीला ओवन मध्ये बेक करायचे. थोडं थंड झाल्यावर एक काटा चमचा घेऊन नुसते हळूहळू  त्या भोपळ्यावर फिरवल्यास त्याच्या शिरा निघतात. या शिरा नुडल सारख्या दिसतात म्हणूनच याला स्पगेट्टी स्क्व्याश  असे म्हणतात. इथले लोक याचा पास्ता बनवतात. मी मात्र याची मुळ्याची भरड लावून जशी भाजी करतात तशी भाजी केली होती. या भोपळ्याची खीर पण छान होईल. काही भाज्यांना मात्र भारतीय style चांगली लागेना. जसे कि ब्रोकोली आणि ब्रुसेल स्प्रोउत! मला ब्रोकोली फक्त तेल तिखट मीठ लावून मायक्रोवेव्ह केलेली आवडते. हवेच असेल तर थोडे चीज लावायचे.

ब्रसेल स्प्राऊट कसे हि बनवले तरी आवडेना! काही दिवसापूर्वी ब्रसेल स्प्राऊट ची भाजी एका अमेरिकन मित्राकडे खाल्ली. आणि या भाजी बद्दलचे मतच बदलून गेले. ब्रसेल स्प्राऊट आणि लसणाच्या पाकळ्या एकत्र तुपात थोड्या परतून घ्यायच्या आणि २० मिनिट ओवन मध्ये बेक करायचे. थोडासा काळसर रंग आला कि काढून घ्यायचे! मस्त! हिवाळ्यात भोपळ्यांच्या बरोबरीने आणखीन एक गोष्ट बाजारात असते ती म्हणजे क्रानबेरी! हि  क्रानबेरी चवीला आंबट आणि थोडीशी  तुरट असते. Thanksgiving च्या काळात हि क्रानबेरी सर्वत्र दिसायला लागते. लाल राणी कलर ची हि क्रानबेरी दिसायला खूप छान दिसते आणि त्यात अनेक जीवनसत्व आहेत. इथे त्याचा सॉस खूप फेमस आहे. या वर्षी मी एकदा दोनदा क्रानबेरी घेऊन आले होते. एकदा त्याचा jam  बनवला आणि आता त्याचे लोणचे बनवणार आहे!

खाली काही इतर website वरच्या रेसिपीज देत आहे. नक्की करून पहा! तुमची एखादी आवडती रेसिपी असेल तर comment सेक्शन मध्ये नक्की शेयर करा! मला आवडेल नवीन काही तरी शिकायला!  http://showmethecurry.com/pickles-chutneys/cranberry-pickle.htmlhttp://showmethecurry.com/appetizers/tandoori-broccoli.html,

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: