तलफ

चहा पिणाऱ्यांना चहा बनवण्यासाठी आणि पिण्यासाठी कोणते हि कारण चालते. पीने वालों को पीने का बहाना चाहिये! सुनो बहाने !!!  मग ते कारण मस्त गुलाबी थंडी असो, सततचा लागून राहिलेला पाऊस असो किंवा खूप उकडतंय बुवा म्हणून ice टी पिण्याची आलेली हुक्की यापैकी कुठलेही असू शकते. कधी सकाळ झाली म्हणून, दुपारची चहाची वेळ झाली म्हणून तर रात्रीचे जागायचे आहे म्हणून. कधी हाच चहा खूप दिवसांनी भेटलेल्या मित्रांची मध्यरात्र उलटून गेली तरीही न संपणारी गप्पांची मैफिल गाजवतो तर कधी परीक्षांच्या जागरणाला सोबत करतो किंवा सहज पाय मोकळे करण्यासाठी टपरीवर चक्कर मारायचा बहाणा देतो. चहा म्हणजे आम्हा भारतीयांचा जीव कि प्राण!

Chaha!!! Courtesy: Wikipedia :)
Chaha!!! Courtesy: Wikipedia 🙂

‘अतिथी देवो भव’ अस सांगणारी आमची संस्कृती! घरी आलेल्या पाहुण्याचे निदान चहा देऊन तरी आदरातिथ्य करण्याची प्रथा असल्याने पाहुणे म्हणल कि चहा आलाच! मग घरातल्या गृहिणीला सहज हाक जाते ” अगं (अमुक कोणीतरी) आलंय चहा टाक बरं “(खरं तर हा पण एक बहाणाच बरका!) किंवा ऑफिस मध्ये कोणी ओळखीचे येताच ” दो चाय बोलना जरा ” अशी हाक नक्कीच ऐकायला मिळते. माझी आई लग्नाआधी चहा प्यायची नाही.  मग कुणा नातेवाइकाकडे  गेल कि पहिला प्रश्न असणार “चहा घेणार न?” नाही म्हणताच एकतर त्यांना वाईट वाटणार आणि दुसरं म्हणजे आई साठी काहीतरी वेगळ बनवावं लागणार. उन्हाळ्यात निदान लिंबू सरबताचे ऑप्शन असते पण हिवाळ्यात दुध तरी घ्यावे असे त्यांना वाटे! तिला त्याची लाज वाटायची. मग हळू हळू तिने चहा पिण्यास सुरुवात केली.

माझी  आणि चहाची पण अशीच on /off relationship आहे. लहानपणी आम्ही दुध आणि बोर्नविता प्यायचो. कधी आई त्यांच्या चहाच्या पत्तीत दुध उकळून (आमच्या समाधानासाठी) ‘मॉक चहा’ बनवायची. एरवी आम्ही बच्चे कंपनी जरी चहा मधून वजा असलो तरी त्याला अपवाद असायचा आजारपणाचा. सर्दी, खोकला किंवा ताप आला असला कि आई मस्त अद्रकाचा चहा प्यायला द्यायची! मग पूढे इंजिनियरिंगला आत्त्याकडे असतांना पुन्हा चहा प्यायचे मग नंतर कधीतरी पुन्हा बंद! त्यामुळे ‘चहाची तलफ येणे’ हा माझ्यासाठी एक न अनुभवलेला वाक्प्रचार आहे… माझ्या आजोबांना ४ ४:३० ला चहा लागायचा मग घड्याळाचा काटा अगदी दोन मिनिटे इकडे तिकडे गेला तर ते तडक स्वैपाक घरात यायचे आणि माझ्या आईला म्हणायचे” आज आमचा चहा विसरलात वाटत!!!”

इथे चहाचे एवढे प्रस्थ नाही. इथे कॉफीचे राज्य आहे. आपल्याकडे कॉफीला दुय्यम स्थान आहे. नाही म्हणायला आपल्याकडे दक्षिणेला फिल्टर कॉफी आहे.  पण कॉफी म्हणजे नेसकॉफी असे समीकरण ठरलेले आहे. आपली कॉफी म्हणजे  instant  कॉफी. कधी एखादा पाहुणा चहा पीत नसेल तर त्याच्यासाठी आणली जाणारी कॉफी तो गेल्यानंतर मात्र कोपऱ्यात तशीच पडून राहते!  सुरुवातीला मला इथली कॉफी बिलकुल आवडायची नाही.  देशी लोकांना बघून सवय झालेली कॉफी विकणारी मला पाहताच म्हणणार “कॉफी विथ क्रीम अन्ड शुगर?”मी ” हो” म्हणताच भसकन साखर आणि दुध टाकणार आणि काही तरी करून ठेवणार! आपल्याला दुध टाकून कॉफी/ चहा पिण्याची सवय असल्याने  दुध साखर घालूनही ती कॉफी मनासारखी लागायची नाही. मी आणि नीरज मिळून एक स्मोल कॉफी घ्यायचो. एक- दोन घोट पिउन मी तो कप त्याच्या हवाली करायचे! इथले कॉफीचे कप खूपच मोठे असतात. लहान कप भारतातल्या २ कपाच्या बरोबरीचा आणि मोठा कप लहान कपच्या तिप्पट! त्यामुळे एक कॉफी आम्हा दोघांना खूप ह्वायची तिथे इथले लोक मोठा कप सहज संपवतात!

इथे चहा म्हणजे बिन दुधाचा आणि बिन साखरेचा आणि वेगवेगळ्या फ्लेवरचा. काही गमतीदार

Chinese Tea Courtesy : http://rivertea.com/blog/the-traditional-chinese-tea-ceremony-part-i/
Chinese Tea
Courtesy : http://rivertea.com/blog/the-traditional-chinese-tea-ceremony-part-i/

combinations मी इथेच आल्यावर पहिली जसे कि मिंट चोकलेट, लेमोन ग्रास चहा किंवा फ्रुट च्या फ्लेवरचा चहा… बऱ्याच Asian countries मध्ये सुद्धा चहा बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच असतो.  जापनीज संस्कृती मध्ये तर चहा पिण्याचा खास कार्यक्रम असतो. चायनीज लोक खूपशा पाण्यात चहाची पाने उकळून सोम्य चहा बनवतात आणि तो दिवसभर पिण्याची त्यांची पद्धत आहे. माझी एक चायनीज मैत्रीण चीन मधून येतांना निरनिराळ्या प्रकारचे चहा जसे कि गुलाबाच्या पाकळ्यांचा चहा, ग्रीन टी, फुलांचा चहा, ताजी चहाची पाने  घेऊन आली होती. आम्हा दोघांना चायनीज किंवा तत्सम Asian हॉटेल मध्ये दिला जाणारा चहा पण खूप आवडतो.

मी मुलगी असल्याने कधी टपरीवर उभे राहून चहा पिण्याचा chance मला मिळाला नाही… पण मुलांसाठी चहाची टपरी हि ‘बऱ्याच ‘ कारणांसाठी महत्वाची जागा असते! पण संध्याकाळच्या वेळेस गाडी घेऊन मोकळ्या हवेसाठी, थकलेल्या मनाला आणि विचारांना नवी उभारी देणारी चहाची टपरी नीरज अमेरिकेत सगळ्यात जास्त मिस करतो!

Advertisements

2 thoughts on “तलफ

Add yours

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: