वारसा दक्षिणेचा!

ईडली, दोसा, उत्तपा आणि उपमा हे मुळचे जरी दक्षिणात्य पदार्थ असले तरी महाराष्ट्रात त्यांचे चांगलेच बस्तान बसले आहे. नाश्त्याच्या  मेनू मध्ये त्यांना कायमच स्थान मिळालं आहे. आणि ते मिळवून देण्यात मोठा वाटा उडुपी हॉटेल्सचा आहे.  गरमागरम इडली, मेदुवडा आणि त्याबरोबर आंबट गोड आणि खमंग असे सांबार आणि ओल्या नारळाची चटणी हि आता फक्त हॉटेलांची मक्तेदारी न राहता गाड्या -गाड्यावर सहजपणे मिळू लागले आहेत. आता तर तयार ताजे इडलीचे पीठ पण बाजारात उपलब्ध झाले आहे. पीठ बाजारातून आणायचे आणि घरी फक्त सांबार आणि चटणी बनवली कि झाले. मला आठवते रविवारी आमच्याकडे इडलीचा बेत असला कि आई शुक्रवार पासून कामाला लागायची. शुक्रवारी रात्री झोपायच्या आधी इडलीचा रवा आणि उडदाची दाळ  वेगवेगळ्या पाण्यात भिजवून ठेवायची. दुसऱ्या  दिवशी सकाळी त्यातले पाणी उपसून मिक्सर मधून बारीक करून घ्यायची  आणि दोन्ही पीठ मिक्स करून आंबवन्यास  ठेवायची. मग रविवारी सकाळी इडली आणि जोडीला सांबार आणि ओल्या नारळाची चटणी असा फक्कड बेत असायचा. इडलीला स्वतःला अशी काही चव नसते.  सांबार बनवणे सोपे असले तरी बरेच मोठे काम असते. वेगवेगळ्या भाज्या, चिंच गुळ आणि खास असा सांबार मसाला टाकून पातळ वरणासारखे सांबार आणि ओल्या नारळाची लसुन, हिरवी मिरची आणि दही घातलेली चटणी याने इडलीला खरी चव येते. काही जन या चटणीत वाटलेली हरभऱ्याची दाळ पण घालतात.

इडली आणि सांबार
इडली आणि सांबार

मला स्वतः ला इडली, दोसा आणि उत्तपा हे सगळेच आवडते पण दोसा जरा जास्त. उत्तपा दोशा सारखाच पण जाड असतो. दोशाच्या पिठापेक्षा उत्तप्याचे पीठ घट्ट असते आणि तो बनवताना त्याच्या पिठात कांदा, टमाटे किंवा ढबू मिरची/ नेहमीची मिरची टाकता येते. पिझ्झा सारखे उत्तप्यामध्ये वेगवेगळे आवडीप्रमाणे टोपिंग वापरता येतात.  सोनेरी रंगाचा, कुरकुरीत दोसा आणि बरोबरीला मसालेदार बटाट्याची भाजी असले कि मग मला काहीच लागत नाही. हि बटाट्याची भाजी पण मला खूप आवडते. उकडलेले बटाटे. कांदा, लसुन, हिरवी मिरची, थोडेसे अद्रक आणि कोथिम्बिर आणि कढीपत्ता (must ) आणि उडदाची दाळ आणि वाळलेली लाल मिरचीची फोडणी. आत्तापर्यंत माझा असा समाज होता कि दोसा म्हनल कि बटाट्याची भाजी पाहिजेच पण आजकाल लोक अतिशय क्रीयेतीव झाले आहेत. चीज, वेगवेगळ्या भाज्या वापरून चायनीज फील दिलेला स्प्रिंग दोसा मी पहिल्यांदा ठाण्याला खाल्ला होता.

इथे माझी एक तेलगु मैत्रीण राहते. ती मला म्हणाली कि ते इडली आणि दोशाबरोबर दाळीची पूड चटणी ( milagai podi)  किंवा तमाट्याचि  चटणी खातात. तिने आणखीन एक नवी माहिती पण पुरवली, ती म्हणजे ते इडली रव्याच्या ऐवजी तांदूळ वापरून इडली बनवतात. हा तांदूळ आपल्या तांदळापेक्षा थोडा जाड असतो. त्याला parboiled तांदूळ असे म्हणतात. उडदाचे  पीठ आणि तांदळाचे पीठ एकजीव झाले तर इडली जास्त चांगली होते आणि दक्षिण भारतात या साठी खास दगडी वरवंटा वापरतात. तिने खास भारतातून येताना हा वरवंटा आणला होता. माझी अतिशय जवळची अशी एक तमिळ मैत्रीण आहे. ती फिलाडेल्फियाला आमच्या वरच्या मजल्यावर रहायची. ती अतिशय सुंदर दोसा आणि मेदुवडा बनवायची. नीरजला तिने बनवलेला वडा आवडतो म्हणून लक्षात ठेऊन वडा बनवायची. एक-दोनदा तिने मला डबाभर दोश्याचे पीठ पण दिले होते. इथे हिवाळ्यात वातावरण थंड असल्याने पीठ नीट  आंबत नाही. अशावेळेस मी ओवन हलकासा गरम करून रात्रभर पीठ त्यात ठेवते मग ते चांगले आंबते. इथल्या इन्दिअन स्टोर मध्ये पण रेडीमेड पीठ मिळते पण कधी कधी खप जास्त नसेल तर बरेच दिवस ते विकले जात नाही मग ते आंबट होते.

P1010172
गूळपाङ्गळु

इडली दोश्याच्या संगतीने आई आणखीन एक प्रकार करते. त्याचे नाव फार गमतीदार आहे. गूळपाङ्गळु  किंवा गुन्तपाङ्गळु (Thanks to Sheetal, I came to know the actual name of this dish! actual name: गुंथपोंगनालू). याच्या पिठात उडदाच्या दाळीच्या बरोबरीने हरभऱ्याची दाळ पण टाकतात. पीठ आंबले कि त्यात मीठ, हिरवी मिरची टाकून नीट मिक्स केले जाते. मग ते गूळपाङ्गळु बनवण्यासाठीच्या खास पात्रात टाकले जाते आणि त्यावर झाकण टाकून ते शिजवले  जाते. मग मस्त टपोरे गूळपाङ्गळु तयार होतात. आई या गूळपाङ्गळु सोबत चिंचेची चटणी करते. हि चटणी अतिशय सोपी आणि अत्यंत चविष्ट आहे. चिंचेचा कोळ घ्यायचा आणि त्याला फोडणी द्यायची. यात घट्टपणा येण्यासाठी तेलावर परतलेल्या कांद्याची पेस्ट टाकायची आणि चवीला गुळ, मीठ, तिखट. आमच्या कॉलनीत गणपतीला आनंदनगरी भरायची. या आनंदनगरी मध्ये कॉलनीतले लोक घरून एक पदार्थ आणायचे आणि तो विकायचे. आईने एकदा गूळपाङ्गळु बनवले होते आणि अवघ्या काही मिनिटात ते पूर्ण कॉलनीत हिट झाले होते.

गुजराथी हायस्कूल मध्ये मधल्या सुट्टीत एक माणूस इडली विकायला यायचा. तो घरून इडली आणि चटणी बनवून आणत असे. त्याचा छोटासाच धंदा होता म्हणून मग लिमिटेड इडल्या तो आणायचा. मधल्या सुट्टीत जर तुम्ही पहिल्या ५ – १० मिनिटात जर तिथे पोहोचला नाहीत तर इडली मिळण्याची काही शक्यता नसायची. मला आठवते जास्तीत जास्त २ – ३ रुपयांना ती इडली असायची पण त्या काळी आम्हाला ती महाग वाटायची. कधी कधी जर आई ला आम्हाला डब्बा देत आला नाही तर आम्ही ती इडली खायचो. गोविंदा मधली सुट्टी झाली कि धूम ठोकून त्या इडली वाल्याकडे जायचा आणि त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी इडली घेऊन ठेवायचा. त्या इडली सोबत तो माणूस खूप चटणी द्यायचा.

बाहेर जाऊन हॉटेल मध्ये खाल्लेला पहिला प्रकार पण दोसा आणि इडलीच होता. माझा सुहास काका जेंव्हा नांदेड ला आला होता तेंव्हा आम्ही सगळे नांदेडच्या गोदावरी हॉटेल मध्ये गेलो होतो. तेंव्हा प्रथमच माझ्या काकूने मला काटा चमचा वापरून कसे खायचे ते शिकवले होते. त्यात किती यश आले होते ते मात्र मी ‘सोयीस्कर ‘ रित्या विसरले आहे! उदगीरला असतांना आम्ही जवळपास दर आठवड्याला तिथल्या एका हॉटेल मध्ये जात असू. मला अजून आठवते आम्ही एकदा इडली, वडा, उत्तपा आणि दोसा असे सगळे एकदाच ओर्डर केले होते आणि संपवता संपवता आमच्या नाकी नऊ आले होते.

रवा इडली
रवा इडली
खव्वया साठी मुंबई म्हणजे अगदी स्वर्ग आहे. इथे कोणत्याही वेळेला आणि वाजवी किमतीत खायला मिळते. इडली, वडा, चायनीज याचे गाडे अगदी कोपऱ्या-कोपऱ्या वर उपलब्ध असतात. असेच एकदा आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून IIT मुंबई मध्ये टेक फेस्ट साठी गेलो असतांना खाल्लेली इडली मला आजही स्मरणात आहे. मुंबईला राणीताई कडे असताना ती पण बरेचदा इडली बनवायची.  राणीताईला इडली प्रचंड आवडते. ती तर म्हणते ती बहुतेक मागच्या जन्मी नक्कीच south Indian असणार.
….नांदेड तसे आंध्र प्रदेशच्या बरेच जवळ आहे बहुतेक हा ‘वारसा’आम्हाला तिथूनच मिळाला असेल.
Kind alert: The images shown in this blog may make you hungry. Please don’t blame author for that! 🙂
Advertisements

2 thoughts on “वारसा दक्षिणेचा!

Add yours

  1. I totally blame author for images. 🙂 And yes, I also like Gulpaangalu.

    I have one friend from Kerala. Her father is class apart in finishing off Dosa with forks, that too in a time lesser than we generally take having Dosa with our hands.

    BTW was it Rajashree hotel you used to visit for the weekly fest of South Indian dishes in Udgir? It’s gone now.

  2. Thank You Amar…Its been ages since I left Udgir. I don’t remember the exact name but do you know the chowk near bus stand? I vaguely remember the hotel being there…:)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: