खिचडी

खिचडी म्हणल कि सगळ्यांना आजारपणाची आठवण येते. मला मात्र खिचडी हे comfort फूड वाटते. बाहेर मस्त थंडी पडली असताना वाफाळलेली खिचडी आणि त्यासोबत उडिदाचा पापड आणि आंब्याचे किंवा लिंबाचे लोणचे ! खिचडी या प्रकाराशी कितीतरी आठवणी जोडल्या गेल्या आहेत. घरी आईच्या हाताची खाल्लेली खिचडी, औरंगाबादला खाल्लेली आणि नंतर माझी favorite झालेली गुजराती खिचडी आणि इथे फिलाडेल्फिआला आले त्या दिवशी नीरजने केलेली खिचडी !

खिचडी बनवण्याची कृती जवळपास पूर्ण भारतात सारखीच आहे. कुकर मध्ये तेल गरम करून त्यात कढीपत्ता , मोहरी जिरे याची फोडणी करून घ्यायची. त्यात भाताच्या प्रमाणात पाणी टाकायचे त्यात आता तांदूळ आणि मुगाची दाळ टाकायची. हवेच असेल तर कोथिंबीर  टाकायची. हळद आणि मीठ टाकून भात शिजवतात तसे शिजवायचे. झाली खिचडी तयार ! आई खिचडी बनवताना कधीच थंड पाणी वापरत नाही ती नेहमी आधीच उकळलेला पाणी खिचडीत टाकते. तिचे म्हणणे  आहे कि त्याने खिचडी ला चांगली चव येते . हि झाला बेसिक खिचडीची रेसीपे. आता या रेसिपिचे घरोघरी वेगवेगळे  version करतात. काही ठिकाणी मुगाची दाळ न वापरता तुरीची दाळ  वापरतात. राजस्थानी खिचडी बनवताना दाळ  आणि तांदूळ भाजून घेतात. फोडणी करताना अद्रक, लसुन आणि हिरवी मिरची घालतात आणि कधी कधी भाज्या घालतात.  कुणाला साधी खिचडी आवडते तर काही जणांना भाज्या घालून बनवलेली मसाला खिचडी. मला मात्र साधी खिचडी आवडते.

खिचडी बनवली कि त्या सोबत काही टिपीकल गोष्टी बनवल्या जातात. जसे कि  गुजराती आणि राजस्थानी लोक कढी बनवतात,  काही जण तमाट्याचे किंवा चिंचेचे सार, ताक किंवा मठ्ठा , किंवा नुसते दही, तूप किंवा दुध. आमच्या कडे तूप , दही याच्या सोबत उडदाचा पापड आणि आंब्याचे किंवा लिंबाचे लोणचे असे ठरलेले असते.  नीरजला  जेवणात एकतरी भाजी लागतेच मग आम्ही खिचडी केली कि त्यासोबत तमाट्याचि आणि कांद्याची कोशिंबीर करतो.  इथे V8 नावाचा एक वेगीतेबल जूस मिळतो . त्यात टमाटे आणि काही भाज्या असतात. मी त्या जूस ला अद्रक आणि लसणाची फोडणी देऊन त्यात रस्सम मसाला घालून झटपट रस्सम /सार बनवते .  🙂 कैरीच्या दिवसात पन्हे आणि खिचडी! बाबा कॉलेज मध्ये असतानाची एक आठवण आहे. बाबांचा आंध्र प्रदेश मधला एक मित्र होता.  नांदेड हे महाराष्ट्र आणि आंध्रच्या बोर्डर वर आहे. तो होस्टेल वर राहायचा. तो घरून येताना तांदूळ, दाळ  आणि चिंच घेऊन यायचा. खिचडी बनवली कि तो चिंचेचे सार बनवायचा. बाबांना या साराची आजही आठवण येते. आई पण चिंचेचे सार बनवते कधी कधी खिचडी बरोबर.

माझ इंजिनीरिंग औरंगाबादच्या जवाहरलाल नेहरू कॉलेज मधून  झाल. तेंव्हा मी माझ्या आत्याच्या घरी राहायचे . आत्या आणि मामांच्या एनिवर्सरी च्या निमित्ताने एकदा आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो . मला आठवते तेंव्हा प्रदीप काका पण आमच्या सोबत आले होते. आम्ही औरंगाबादच्या भोज या गुजराती थाळी साठी प्रसिद्ध असणाऱ्या हॉटेल मध्ये गेलो होतो. माझा गुजराती थाळी खाण्याचा हा पहिलाच अनुभव होता. आम्ही सगळे जेवायला बसलो तसे आत्या मला म्हणाली ,” अम्मू , खिचडी साठी भूक ठेव !” खिचडी साठी भूक??? त्या थाळी मध्ये वाढलेला प्रत्येक पदार्थ अतिशय आकर्षक दिसत होता . आणि त्यांना सोडून आत्या खिचडीसाठी भूक राहू दे अस म्हणत होती. गम्मत आणि आश्चर्य वाटले. ताटातले एक एक पदार्थ मनापासून संपवणे सुरु झाले . मग वेटर खिचडी घेऊन आला. थोडीशी खाउन बघू आणि नाही आवडली तर मग आणखीन कशावर तरी ताव मारू असे मनात ठरवले आणि थोडीच खिचडी वाढ असे त्या वेटर ला सांगितले. गुजराती खिचडी आपल्या खिचडी पेक्षा पातळ असते आणि त्यात मुगाची पिवळी दाळ न घालता हिरवे कवर असलेली मुगाची दाळ घालतात. पहिला घास घेतला आणि कळले कि आत्या का तिची शिफारस करत होती . दालचिनी , लवंग आणि अजून काही मसाले घालून केलेली हि खिचडी माझी favorite बनली तेंव्हा पासून. त्या खिचडीवर मस्त तुपाची धार सोडून आणि गुजराती कढी टाकून मनसोक्त खाल्ली .

खिचडी म्हणलं कि डोळ्यापुढे तांदुळाची खिचडीच येते . पण गव्हाच्या , ज्वारीच्या आणि बाजरीच्या जाड भरडीची पण खिचडी करतात. आई हिवाळ्यात बाजरीच्या भरडीची खिचडी बनवायची. हा प्रकार मसालेदार कॅतेगोरी मध्ये मोडला जाणारा आहे.  बाजरी हि फक्त काही दिवसच मिळते  आणि ती उष्ण असते म्हणून हिवाळ्यात हा प्रकार करण्याची पद्धत आहे.  राजस्थानात बाजरीचे पिक जास्त होत असल्यामुळे तेथे हा प्रकार जास्त famous  आहे.  बाजरीची खिचडी वर बारीक चिरलेला कांदा, कोथिम्बिर आणि तूप किंवा ताक टाकून खायला छान लागते. राणीताई कडे तिची सासू कण्याची खिचडी बनवते. कन्या म्हणजे गव्हाची भरड. काही ठिकाणी या प्रकाराला दलिया पण म्हणतात .
नीरज अमेरिकेत आला तेंव्हा त्याला  पहिल्यांदा स्वतः च्या हाताने स्वैपाक करण्याची वेळ आली. खिचडी हा सोपा आणि पौष्टिक पदार्थ असल्याने आणि नीरज तेंव्हा विध्यार्थी असल्याने  सासूबाईनी त्याला खिचडीचा मसाला सोबत दिला होता .खिचडी हा तेंव्हा पासून त्याचा आवडता प्रकार आहे . मी लग्न झाल्यावर काही महिन्यांनी जेंव्हा प्रथम इथे आले त्या दिवशी मला घरी आल्यावर काम करावे लागू नये म्हणून त्याने खिचडी केली होती. त्या खिचडीची सर मात्र कोणत्याच खिचडीला येऊ शकत नाही ! 🙂
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: