Left overs!!!

पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरात निदान ८-९ माणसे तरी नक्कीच असायची . चिल्लर पार्टी न  मोजता !अशावेळेस घरातल्या गृहिणी अंदाज्याने पोळ्या /भाकरी किंवा भात बनवत असत. मोजून मापून स्वैपाक करण्याची  त्याकाळी किंवा आजही आपल्याकडे  पदधत  नाही. घरी अचानक एक दोन पाहुणे आले तरी त्यांना जेवण पुरावे एवढे जेवण बनवण्याची सवय आपल्याकडे असते. कधी कुणाला जास्त भूक कधी कमी! कमी पडले तर वाईट वाटते .मग कधी पोळ्या जास्त तर कधी भात जास्त होतो. हा भात किंवा पोळी जर दुसऱ्या दिवशी ताटात वाढली तर नाकं लागलीच मुरडली जातात. भाकरी मात्र याला अपवाद आहे. शिळी भाकरी भाजी,भुरका किंवा चटणी म्हणजे माझ्या साठी स्वर्ग!

आता या शिळ्या पोळ्यांचे काय करणार असा प्रश्न एखाद्या सुगरण गृहिणीला पडून तिने त्यातून कुस्करा किंवा फोडणीचा भात याचा शोध लावला असावा असे मला वाटते. कुस्करा किंवा फोडणीचे तुकडे बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे . शिळ्या पोळीचे बारीक तुकडे करून घ्यायचे किंवा तिला बारीक कुस्करायचे आणि याला कांदा, कोथिम्बिर, शेंगदाणे टाकून फोडणी द्यायचे. वरून मस्त लिंबू पिळले कि झाले. आईच्या भाषेत त्याला ‘नवसारल्यावर ‘बघा यावर कसे तुटून पडतात सगळे! आम्ही लहान असतांना आई पोळीचा लाडू बनवायची. पोळीच्या कुस्कर्यात तूप आणि गुळ टाकून एकजीव होईपर्यंत mix करायचे. आणि मग त्याचे लाडू बनवायचे. आमच्या घरात आम्ही सगळे गोडघाशे असल्याने आमच्या कडे हा प्रकार जास्त प्रिय आहे !
P1010129
आई बाबा १ ९ ७ ८ – १ ९ ८ ६ दरम्यान किल्लारी ला राहत होते. त्या काळात त्यांची बर्याच जणांशी घरोब्याचे संबंध झाले होते. त्यांच्यापैकीच एकाची मुलगी भारत नांदेड ला २ -३ महिने ट्रेनिंग साठी येणार होति. आईने आग्रह केला कि तिने आमच्या सोबतच राहावे. तिची ट्रेनिंग तरोडा नाक्याच्या जवळच असल्याने तिला पण ते सोयीचे होणार म्हणून ती पण राहण्यास हो म्हणाली . एके दिवशी सकाळी आई कुस्करा बनवत असताना भारत ने आईला एक नवाच पदार्थ शिकवला . तिने लसुण , हिरवी मिरची आणि अद्रक घालून फोडणी बनवली आणि त्यात थोडे शेंगदाण्याचे कुट ,पाणी घालून ते उकळत ठेवले. या उकळत्या पाण्यात तिने पोळीचे तुकडे टाकून शिजवले . मस्त तूप आणि कोथिम्बिर टाकून आईने ते आम्हाला खायला दिले आणि आम्हाला कळले पण नाही कि अरे हि शिळी पोळी होती म्हणून!. आजही आम्ही हा प्रकार भारतची आठवण काढत करतो आणि खातो.
कुस्करा करायचा असला कि बाबा पोळी मस्त बारीक कुस्करून देतात . बाबांना  सकाळी लवकर लवकर जेऊन ऑफिस ला जाण्याची सवय असल्याने ते पोळी आणि भाजी वरण कुस्करून खायचे त्याचाच परिणाम म्हणून बाबांना कुस्करण्याची सवय आहे.  तुम्हाला वाटेल आज काय हिने शिळ्या पोळीवर लेख लिहिला आहे पण मी सहज काहीतरी random search करत होते आणि मला चक्क फोडणीचा भात आणि फोडणीची पोळी इथे मिळेल अशी जाहिरात सापडली ! आता बोला !
फोडणीचा भात हा पण माझा आवडीचा प्रकार आहे . संध्याकाळच्या राहिलेल्या भाताला कांदा, शेंगदाणे टाकून फोडणी दिली कि मस्त लागते . मी भातात कांदा उभे चिरलेले गाजर , कोबी , ढबू मिरची ,कॉर्न , मटार आणि सोय सॉस टाकून Chinese चा फिल  देते. भाताचे कितीतरी प्रकार करता येतात जसे कि लेमोन राईस , curd राईस  किंवा चित्रान्न ! राणीताई मस्त curd राईस बनवते. भात मोकळा करून घ्यायचा , त्यात बारीक चिरलेली किंवा खवलेली काकडी टाकायची. मग दही ,मीठ, लाल मिरचीची ओबड धोबड पूड आणि किंचित साखर घालून mix करायचे. याला छान हिरवी मिरची , कढीपत्ता, जिरे आणि मोहरीची फोडणी दिली कि बहार  येते! आपल्याकडे दही भात खाणे हे खुप common आहे पण इथे मी एकदा डब्ब्यात असा भात नेला होता तर सगळ्यांना एवढे आश्चर्य वाटले कि काय सांगू ! रात्रीचे वरण किंवा पातळ भाजी उरलेली असेल तर त्यात थोडे ज्वारीचे पीठ , थोडी कणीक, बारीक चिरलेला कांदा ,कोथिम्बिर टाकले कि छान झटपट थालीपीठ बनवता येतात .
IMG_0647
शिळ्या पदार्थांना वापरून काही तरी नवे बनवणे हा प्रकार इथे अमेरिकेत पण आहे. इथे कधी कधी ब्रेड संपत नाही मग तो घट्ट आणि वाळका होतो अशा ब्रेडचे इथे कॅसेरोल  बनवतात . कॅसेरोल म्हणजे एका मोठ्या भांड्यात भाज्या , ब्रेडचे तुकडे ,चीज, अंडे ,वेगळे वेगळे सॉस टाकून बेक केलेली डीश ! ब्रेड जास्त मऊ न होता त्याला मस्त टेक्स्चर राहते म्हणून खास या डीशमध्ये शीळा ब्रेड वापरतात. इथे पोळी शिळी किंवा ताजी दोन्हीही आम्हाला मेजवानीच वाटते. पोळी बनवली कि दुसऱ्या दिवशीच्या डब्ब्या साठी राहावी असे वाटले तरी त्याच दिवशी फस्त होते मग कुस्करा कशाचा करणार. अशावेळी संध्याकाळी कधी कधी मी ताज्या ब्रेडचा चिवडा करते.

शिळे खाणे आरोग्यासाठी ठीक नाही पण जर एखादे वेळेस खाल्ले तर काही हरकत नाही आणि त्याचे जर इतके प्रकार बनवता असतील तर एखादी पोळी जास्त बनवाच !

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: