मोदकपर्व

Hi friends, today I want to share a story with you which is really dear to my heart. This is a story about my mom and her seemingly impossible promise to god that she will make 1001 sweet dumpling every month on an auspicious day for rest of her life! I know this is Marathi version of it but I promise I am writing an English version of it. Coming soon watch for it… it’s going to be legend… wait for it…ary!  Legendary!!!

51, यक्ष, अष्टविनायक नगर, नांदेड. आमच्या नांदेडच्या घरचा पत्ता. आम्ही येथे मी पहिलीत असताना सोलापूराहून शिफ्ट झालो. माझा सुधीर काका या घरच्या बांधकामाकडे लक्ष द्यायचा. आमच्या घरासमोर मोठं मैदान आहे. या मैदानावर आम्ही खेळात असू. नावाप्रमाणेच आमच्या कॉलनित अष्टविनायकाचे मंदिर आहे. घरासमोर गणपतीच मंदिर असावे अशी बाबांची नेहमीची इच्छा होती. नंतर कळले की बाबानी जेंव्हा हे घर विकत घेतले तेंव्हा त्यानी या मैदानाचा प्लान पहिला होता आणि त्यांना सोसायटी ने सांगीतले होते की इथे पुढे मागे मंदिर होणार आहे.

अष्टविनायकाचे मंदिर
अष्टविनायकाचे मंदिर

मध्ये काही वर्ष बाबांची बदली उदगीर ला झाल्याने आम्ही तेथे शिफ्ट झालो त्या काळात मंदिराचे बांधकाम सुरू झाले होते. आम्ही परत नांदेडला आलो ते 1996 ला आता मंदिर पूर्णपणे बांधून झाले होते आणि देवाची प्रतिष्ठापना पण झाली होती. सकाळी स्नान झाले की मंदिरात जायचे देवाचे दर्शन घ्यायचे असा आमचा नित्यक्रम सुरू झाला.

IMG_0118
मोदक

चतुर्थीच्या दिवशी इथे अगदी जत्रा भरायची… लांबून लोक यायचे…मग देवासमोर छोटी-छोटी टपरीची दुकाने आली आणि तिथे फुले, दुर्वा नारळ विकले जाऊ लागले. संध्याकाळी चंद्रोदयानंतर पूजा होते या वेळेला गणपती ला मोदकांचा नैवेद्य दाखवतात. मोदक बनवताना मैद्याची पाळी बनवून त्यात खोबरे, गूळ, खारीक याचे सारण भरले जाते आणि हा मोदक तेलात तळला जातो. एक- दोन चतुर्थ्या झाल्या आई थोडी उदास वाटली. तिच्या असे लक्षात आले की इतके लोक येतात पण देवाला येणार्‍याला प्रसाद म्हणून कधी- कधी मोदक पण नसतात. कधी- कधी संध्याकाळच्या आरतीला मोदक खूप कमी असायचे. आईला याचे खूप वाईट वाटले. आणि तिने पुढच्या चतुर्थीला एक आगळीच घोषणा केली. आपण आत्ता पासून 1001 मोदक करणार आहोत  दर चतुर्थीला…बापरे…आमची आई अशीच आहे काहीही ग्रँड लेवेल वर करायचा अस तीच असत… आईच्या मनात मोदक करण्यामागे कुठलाही नवस वगैरे नव्हता…तरीही आम्हाला या महा संकल्पाचा आवाका लक्षात आला तो त्या दिवशी च्या मोदकांच्या फसलेल्या प्रयत्नावरून …आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची आईला ना आम्हाला कोणालाही कल्पना नव्हती…

आईला वाटले 2-3 घन्ट्यात मोदक होऊन जातील म्हणून मग 9 वाजता चंद्रोदय आहे तर 5 ला सुरू केला तर खूप होईल अस आमचा ठरला. आईच्या हाताखाली मी, गोविंदा, बाबा, क्षमा माई अशी गँग सज्ज झाली…जसा-जसा वेळ सरकायला लागला तस-तस लक्षात आला की हे करण किती अशक्य आहे. 2-3 घन्ट्यात फक्त 200 मोदक झाले. आईला खूप वाईट वाटले. त्या दिवशी ती काही जेवली नाही. आम्हाला काही कळेना आता काय करावे??? झालेल्या मोदकांचा देवाला प्रसाद दाखवला. आणि झोपताना असे ठरले की उद्या उरलेले मोदक करायचे. असा हा आमचा पहिला फसलेला प्रयत्न. पण या प्रयत्नात आमची सगळी गणित चुकली, किती सारण, किती मैदा तिंबायचा? साइज़ काय बनवायचा? सगळेच नवीन…पण हा प्रयत्न खूप काही शिकवून गेला जर 1001 मोदक बनवायाचे तर सकाळी लवकर सुरूवात करावी लागणार. आदल्या दिवशी काही प्रेपरेशन करावे.

आईला वाटले होते की आई ,मी, बाबा, गोविंदा, क्षमा माई एवढे जण बसले तर होऊन जाणार पण त्या दिवशी कळले की नाही अजून 2-3 लोक तरी लागणार. मा‍झ्या आईला हरणे माहीतच नाही पक्की खेळाडू आहे ती…या प्रयत्नानंतर तिने सगळी प्लॅनिंग केली…काय- काय चुकले याची यादी केली आणि तिची सगळी शक्ति पणाला लावली…शिंदे काकू, अश्विनी ताई, बोडखे काकू, हरगन्गे काकू आणि आम्ही घरचे अशी आईची टीम तयार झाली. सकाळी आई सारण केले आणि मोदकाच्या पाळी साठी मैदा तिंबून ठेवला…आईच अस म्हणणं असता की करायचे तर चांगलंच करायचा. सकाळी फराळ करून आम्ही सुरूवात केली. एकाने मैद्याच्या पीठाच्या बोट्या बनवायच्या, दुसर्‍याने त्या लाटायच्या, तिसर्‍याने मोदकात सारण भरवायचे अशी असेंब्ली लाइन तयार झाली. अश्विनी ताई सुरेख मोदक बनवायची तिचे सगळे मोदक एकसारखे दिसायचे… मग आई ते तळायची अशा रीतीने 4-5 घन्ट्याच्य प्रयत्नानंतर मस्त 1001 मोदक झाले. नैवेद्य दाखवला. आई सह आम्हाला पण सार्थक झाल्यासारखे वाटले.  असे आता दर चतुर्थीला सुरू झाले. कधी -कधी कमी लोक अवेलबल असायचे तर कधी जास्त पण त्यानुसार 5-6 तासात सगळे मोदक तयार व्हायचे. आरती नंतर सगळ्यांना मोदक वाटायचे. पुढचे काही दिवस कॉलनित सगळ्यांना, घरी येणार्‍या आमच्या/बाबांच्या मित्रांना, अगदी पोस्ट मन पासून काम वाल्या काकू सगळ्यांना हा प्रसाद मिळायचा. संक्रांतीच्या काळात जर चतुर्थी आली तर आई तीळ गूळाचे मोदक बनवायची.

कालांतराने मी इंजिनियरिंग साठी औरंगाबादला गेले, क्षमा माई पुण्याला गेली…शिंदे काकू नागपूर ला शिफ्ट झाल्या आणि अश्विनी ताईचे लग्न झाले. अशा प्रकारे आईची गँग विखुरली गेली. आई- बाबा पण काही महिने ठाण्याला रानी ताई कडे राहत कारण त्या वेळी माझी भाच्ची लहान होती…शन्तनु चे आई- बाबा आणि माझे आई- बाबा आलटुन पालटून ठाण्याला राहत असत. या सगळ्या कारणामुळे आईने खव्याचे मोदक बनवायला सुरूवात केली. रेडी मेड खवा आणून त्याचे मोदक बनवायचे असे सुरू झाले. हे काम त्या मानाने सोपे झाले आणि आई- बाबा दोघं मिळून 2-3 तासात हे मोदक बनवू लागले. आई- बाबा ठाण्याला असले की  हरगन्गे काका -काकू आमच्या साठी मोदक बनवत असत…त्यांचा आई ला फार आधार होता…अजूनही अश्विनी ताई आणि मी भेटलो की मोदकांच्या त्या दिवसाची आठवण नक्कीच काढतो.

Ukadiche modak
उकडीचे मोदक

आता लग्नानंतर मी फिलाडेल्फियाला आले. आणि गणपती चे दिवस आले की मला मोदकांची आठवण येते… चतुर्थी वगैरे इथे कधी आली कधी गेली काहीच काळात नाही पण मी गणपती ला आवर्जून 21 मोदक नक्की करते. कामाच्या नादात किती ही वेळ लागला तरीही… इथे आल्यावर एक गोष्ट चांगली झाली आहे. काहीही खवायाचे वाटले कि स्वत: बनवायचे. बाहेरच्या गोष्टींना ना चव ना खिशात तेवढा पैसा…आणि इंतेरनेत मुळे पदार्थ कसे बनवायचे याची तपशीलवार कृती सहज मिळते. मग असेच एका गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक बनवायचे ठरवले. कसे बनवतात काहीही माहिती नाही…मी मराठवाड्यातली असल्याने उकडीचे मोदक कसे बनवायचे याची काहीच कल्पना नाही. कारण या भागात ते एवढे प्रचलित नाहीत…आई ला उकडीचा धसकाच! ती पण कधी उकडीचे मोदक बनवायची नाही. उकडीचे मोदक बनवण्यातला सर्वात मोठा अडथळा म्हणजे उकड काढणे…उकड म्हणजे उकळ त्या पाण्यात तांदळाचे पीठ टाकून शिजवायचे… मग हे जास्त पातळ होऊ नाही आणि घट्टपण चालत नाही…2-3 वेबसाइट वरची कृती वाचली …सगळी तयारी केली…नीरजला सांगीतला पण नाही…कारण खराब झाले तर काय??  खोबरे आणि गूळाचे सारण तयार झाले आणि त्यावर विलायची टाकून तयार ठेवले…मस्त मोदक झाले…सुंदर जमले…मग सगळ्यांना दाखवले…आई, सासूबाई, फसेबूक वरच्या मैत्रिणी सगळ्या समोर मिरवून झाले…

मोदक आणि गणपती याला आमच्या घरात महत्त्वाचे स्थान आहे. आता जेंव्हा त्या मोदकांच्या दिवसांची आठवण येते तेंव्हा असे वाटते की आईच्या हाताने हे मोदक घडावेत ही ‘श्री’ ची इच्छा असावी… गणपती बाप्पा मोरया!!!

Advertisements

One thought on “मोदकपर्व

Add yours

  1. Hi mugdha ,
    Sorry aatta vachale mi tuze modak parv …khup chaan lihiles g ….khup kautuk watale …ani kharach parat tya divasa madhye gelyasarakhe vatale….khup mast….zhakas…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: