वरण फळे

varanphale
varanphale
Photo from: http://magickadhai.blogspot.com/2013/02/dal-dhokli-varan-phal.html

आजकाल ‘वन पॉट मील्स’ हा माझा आवडता प्रकार झाला आहे…भाजी,भात, वरण, पोळि, कोशिंबीर, चटण्या (अरे स्वीट डिश तर राहिलीच की) हा साग्रसंगीत स्वैपाक सुट्टी असेल तेंव्हा किंवा सणावारी… करायला सुटसुटीत पण पौष्टिक अशा प्रकरांचे जरा जास्तच आकर्षण निर्माण झाले आहे…आता याला तुम्ही आळशिपण म्हणा किंवा आजकालच्या फास्ट लाइफ स्टाईलचा रिज़ल्ट म्हणा…असाच सोपा, पौष्टिक पण चवीला अतिशय छान प्रकार आज तुमच्याशी शेर करायचा आहे…वरणफळे

वरणफळे म्हणजे मसालेदार आंबट वरणामध्ये शिजवलेल्या कणकेच्या चकत्या…कृती 3 स्टेप्स ची…तुरिचि दाळ शिजवून त्याचे आंबट वरण करून घ्यायचे…यात काय काय घालायचे ह्याबाबत पूर्णपणे स्वातंत्र्य…तुरिच्या दाळी ऐवजी मुगाची दाळ वापरली की पचायला पण हलके…कधी आंबट वरण ना करता कसुरी मेथी किंवा पालक घालून वरण करायचे (I will call this recipe forgiving recipe…the recipes which give me freedom to choose what I want to put in it and still taste good…about that coming soon… :)) कणिक घट्ट तींबून त्याची पोळी लाटायची आणि या पोळिच्या शंकरपाल्यासारख्या चकत्या करायच्या आणि त्या उकळत्या वरणात सोडायाच्या…थोड्या- थोड्या वेळाने त्या शिजल्या की नाही ते चेक कराचे आणि शिजल्या की गरमागरम सर्व करायचे…एवढीच ती काय ती कृती…पण मला म्हणाल तर हा माझा सर्वात आवडता प्रकार आहे (हे वाक्य मी बहुतेक प्रत्येक रेसिपी बाबत म्हणत असेल …but I can’t help it I love food… :)) जेंव्हा जेंव्हा वरणफळे बनवले जातात तेंव्हा मस्त सुगंध पसरतो घर भर… गरमागरम वरणफळे मस्त तूप घालून खाताना काय मजा येते म्हणून सांगू…!

बहुतेक सर्वच पारंपरिक पदार्थ बनवण्याची प्रत्येक घरची वेगळी पद्धत असते…आणि त्यांची नावे पण महाराष्ट्रात वेगळी वेगळी आहेत. कुणी वरणफळाणा चाकोल्या म्हणते तर कुणी दाळ ढोकली…पण मूळ गाभा तोच…माझ्या ताईच्या सासरी वरणफळात चिंच गुळ घालत नाहीत आणि वरणफळे लाटून ना करता पीठाची छोटी छोटी बोटी तळहातावर तेल लावून लांबवली जाते …हा प्रकार पण छान लागतो…

माझ्या बाबाना मात्र या वरणफळानपेक्षा (चुलत भाउ!?) दुधफळे जास्त आवडतात…बाबा सकाळी लवकर बॅंकेच्या कामाला जाणार असले की आई उखरी आणि शेन्गदाण्याची चटणी ( उखरी बद्दल स्वतंत्र लेख नंतर… :)) किंवा दुधफळे बनवायची…नावाप्रमाणेच या प्रकारात दुधात शिजवलेल्या कणकेच्या चकत्या कृती सेमच…मग त्या दुधात साखर, विलायची पूड घातली की स्वीट डिश तयार…ब्रेकफास्ट साठी अगदी छान… 🙂

वरणफळे म्हणजे खरे तर पास्टा च एक प्रकारचा… मला  इंडियन आणि वेस्टर्न रेसिपी चे फ्युजन करायला फार आवडते…मग एकदा असच मी वरणात नूडल्स घालून वरणफळे बनवले होते…:)

English recipe:  Photo from : http://magickadhai.blogspot.com/2013/02/dal-dhokli-varan-phal.html

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: