शेन्गोळे

लहानपणी शेन्गोळे बनवायाचे असले की आमची आई सगळी गँग रिक्रूट करायची…हो अगदी बाबा देखील! आई शेंगोळयाचे पीठ भिजवून आमच्या पुढे ठेवायची आणि गॅसवर खमंग फोडणी दिलेले पाणी उकळत ठेवलेले असायचे.

198279_10151827331200167_942238530_n 542334_10151827335490167_790538832_n

शेन्गोळे म्हणजे इंडियन पास्टा! हे बनवण्यासाठी ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, बेसनाचे पीठ विशिष्ठ प्रमाणात मिक्स करून त्यात तिखट, मीठ, लसूण, जिरे आणि ओवा वाटुन त्यात मोहन घालून तींबले जाते. या शेंगोळयाच्या पीठाची छोटी बोटी घ्यायची आणि हाताच्या तळव्यांच्या साह्याने ती लांब  करायची आणि त्याचा कोयरीच्या आकार बनवायचा असे आम्ही करत असु आणि मग या कोयर्‍या छोट्या छोट्या बॅच मध्ये आई गॅसवराच्या उकळत्या पाण्यात सोडत असे आणि त्या खाली बुडाला लागू नयेत म्हणून ढवळत असे. शेंगोळयाच्या पिठाच्या कोयर्‍या बनवणे आम्हाला खूप आवडत असे. कामापेक्षा हा आम्हाला खेळच वाटत असे. आमची क्रियेटिविटी अचानक जागी होऊन आम्ही कोयर्‍या ना बनवता वेगळे वेगळे आकार बनवत असु. कधी गोल, कधी लांबट कधी त्या पीठाची A,B,C D आणि काय काय बनवत असु. मग खाताना तुला माझा गोल आला किंवा तू माझा D का घेतला यावर भांडंण करत असु. खरतर उकळत्या पाण्यात P चा D व्हायला आणि W चा M व्हायला कितीसा वेळ लागतो म्हणा… 🙂 पण आमचे आपले लहानपणीचे  उद्योग आणि भांडणे…

शेन्गोळे हे खरे तर वन पॉट मील आहे. त्या दिवशी शेंगोले सोबत भात बनवला का झाले. या शेंगोळयाच्या पाण्यात भात कालवलेला खूप छान लागतो. लहानपणी आमची एक थियरी होती की शेन्गोळे हाताने खाल्ले की त्याला पाणी खूप सुटते म्हणून! 🙂  शेन्गोळे सहसा तूप टाकून खाल्ले जाते. आम्ही शेन्गोळे कांदा, शेंगदाणे आणि तुपबरोबर खात असु. शेन्गोळे हा अतिशय पौष्टिक प्रकार आहे. या शेंगोळयात पीठ भिजावताना पालक, मेथी किंवा कोथिंबीरही टाकता येते.  कधी कधी बदल म्हणून खीसलेले गाजर किंवा खीसलेले बीट्रूट टाकले तर रंगीबेरंगी शेन्गोळे दिसायला पण छान होतील आणि पौष्टिक पण! काही दिवासपूर्वी एक वीडियो पहिला त्यात एका आज्जिनी शेंगोल्याचा पाण्यात ताक घातले होते. कढि गोळे बनवल्यासारखा प्रकार. फिलाडेलफिया ला ज्वारीचे पीठ तेवढे चांगले मिळत नाही. जुने असते. त्याची भाकरी चांगली होत नाही पण शेंगोळयाना कणीक आणि बेसन घातलेले असल्याने ते पीठ ही चालून जाते. मागे एकदा महाराष्ट्र  टाइम्स मध्ये शेगोल्यांवर एक छान लेख वाचल्याचे आठवते. त्यातील ही कृती दिली आहे.

उकडशेंगुळीः
1)भरपूर लसूण सोलायचा. नखानं किंवा वाटीच्या काठानं त्यांचे तुकडे करून ते जिऱ्यासकट वाटीनं रगडायचे. ज्वारीचं पीठ, त्याच्या चौथा हिस्सा कणीक म्हणजे गव्हाचं पीठ, थोडं कढीचं पीठ म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ (थोडं म्हणजे अगदी चिमूटभर) तिखट, मीठ, हळद, हिंग, लसूण-जिरे यांसह ते तिंबायचं.

2)उंडा तयार झाला की मग दोन्ही तळव्यांमध्ये घोळून त्याचे शेंगुळे करायचे. त्या शेंगुळ्याची दोन्ही टोकं जोडायची म्हणजे शेंगुळ्याला एक गोलाकार प्राप्त होतो.

3)असे शेंगुळे तयार झाले, की मग त्यांना उकडायला पाणी कांद्यासह फोडणीला टाकायचं. त्यात किंचित्‌ मीठ आणि थोडीशी मुगाची डाळ! पाण्याला खळखळून उकळी आली, की त्यात शेंगुळे सोडायचे. त्यांना चांगलं उकडू द्यायचं. मध्येच पळीवर एखादं शेंगुळं घेऊन दाबून पाहायचं म्हणजे शिजलं किंवा नाही याचा अंदाज येतो.

4)गोल ताटात उकडशेंगुळी वाढून घेऊन त्यातल्या बऱ्यापैकी घट्ट झालेल्या पाण्यात ते चुरून खायचं. या पाण्यात शेंगुळ्याची सगळी खमंगाई उतरली असल्यामुळं सगळी शेंगुळी खाऊन झाली, की दोन्ही हातांनी ताट उचलून ते डायरेक्‍ट तोंडाला लावायचं! अशा वेळी कोणी पाहील किंवा काही म्हणेल, याची पर्वा करायची नसते… 🙂

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: