गरीबाची आमटी

P6272827
My Mom…:)
Hello fellow bloggers, all my previous blogs were about biomimetics and bioinspiration because I started this blog as part of assignments for the course I was taking this semester. I loved this blog and I want to continue with this blog. I loved this subject, but I don’t want to restrict myself only to this area so now it’s time to expand my horizon. Spread my wings! So now what? I started to think what I would like to write about and what people might like to read from me. I came up with these three ideas: food (Are you hungry), people who inspire me (Why do I love these people (disclaimer: no copy write infringe intended Po Bronson! I am in love with this title so I thought I will steal it… :)) and spectroscopy (Jiggling and wiggling of atoms). Yep my three loves!  Since this weekend is Mother’s day…this one is for you aai. And I tried hard to write the next part in English but trust me it’s so hard I am switching to my mother tongue! I will be back to English in my next blog …I promise!

प्रत्येकाच्या हाताला एक विशिष्ठ चव असते. सगळ्या ट्रिक्स आणि सगळे साहित्य त्याचप्रमाणात वापरले तरीही ती चव काही येत नाही. माझ्या आईने बनवलेल्या सगळ्या गोष्टींबाबत हे खरे आहे. पण आमच्या सगळ्यांची घरी आल्यावर तिच्याकडे एक फर्माईश नक्कीच असते. ती म्हणजे गरीबाची आमटी! माझे मामा देखील आमच्या घरी आले की म्हणतात ” वहिनी तुमच्या हातची गरीबाची आमटी होऊन जाउ द्या बरे आज.”

गरीबाची आमटी? काय आहे बरे हा प्रकार??? मी एकदा आईला विचारले होते,” आई गरीबाची आमटी असे कसे नाव?” तेव्हा आई म्हणाली” अग, अम्मु, हा पदार्थ अगदी कमी सहित्य आणि जे नेहमी सहज घरात असतात अशा 2-3 साध्या गोष्टी वापरुन बनवता येतो. म्हणून ती गरीबाची आमटी!” गरीबाची आमटी ही बेसनाच्या पीठाची आणि शेंगदाण्याचे कुट वापरुन बनवली जाणारी आमटी. ही आमटी आईने कुठे शिकली किंवा तिचा उदय कुठे झाला हे मात्र माहीत नाही. ही आमटी भात, पोळी किंवा भाकरी कशासोबत ही खाता येते. पण मला मात्र गरमागरम भाकरी बरोबरच ती जास्ता आवडते. अहाहा! 🙂

लग्नानंतर फिलाडेल्फियाला  आले तेव्हा प्रथमच स्वत: करून पहिली. निदान तीनदा ते चारदा करून पाहिल्यानंतर आत्ता जमते मला. माझ्या हातच बनवलेल काय आवडते रे तुला असा नीरजला विचारले असता म्हणाला तू  तुझ्या आईची ती आमटी बनवतेस ना ती मला आवडते! 🙂

आज मदर्स दे च्या निमित्ताने तुमच्या सगळ्याशी ही रेसिपी शेयर करते आहे. नक्कीच करून पहा!

साहित्य: बेसनाचे पीठ, शेंगदाण्याचे कुट, लसणाच्या पाकळ्या, तेल, मोहरी, कढीपत्ता,मीठ, हळद, तिखट आणि कोथिंबीर

कृती: 1) सर्वप्रथम बेसनाचे पीठ थोडेसे तेल घालून खरपूस भाजून घ्यावे आणि एका ताटात काढून थंड होऊ द्यावे.

2) भाजलेले बेसनाचे पीठ आणि शेंगदाण्याचे कूट पाण्यात मिक्स करुन पातळसर पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट पीठले बनवतांना जशी कन्सिस्टेन्सी असते त्या पेक्षा पातळ करावे.

3) एका भांड्यात फोडणीसाठी तेल गरम करून घ्यावे आणि त्यात मोहरी, कढीपत्ता  आणि बारीक चिरलेला लसूण टाकावा. हे दोन्ही जिन्नस तडतडल्यावर त्यात तिखट घालावे. आता या फोडणी मध्ये बेसनाची आणि शेंगदाण्याची पेस्ट घालावी. बेसनाचे पीठ लवकर आळुन येते म्हणून हे मिश्रण सतत हलवावे. आता आपापल्या चवीप्रमाणे त्यात मीठ आणि हळद घालावी.

4) आता हवे तेवढे पाणी घालून एक दोन उकल्या काढाव्यात. आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.

मला स्वत:ला ही आमटी जरा पातळ आवडते. या आमटीचे सर्व गुपित बेसन कसे भाजले आहे यात आहे हे मात्र नक्की!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: